पुरोगामी विचारांना अंतिम मानून राष्ट्रवादी सोडली, प्रशांत जगतापांनी काँग्रेस निवडली, पक्षप्रवेश झाला!

Last Updated:

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील काँग्रेस भवनात प्रशांत जगताप यांनी पक्षात प्रवेश केला.

प्रशांत जगताप
प्रशांत जगताप
मुंबई : गेली २६ वर्षे पुरोगामी विचार आणि शरद पवार यांचा आदेश प्रमाण मानून पक्षहितासाठी झटलेल्या प्रशांत जगताप यांच्या वाट्याला निराशा आली. कारण व्यावहारिक निर्णय घेतले पाहिजे याचा अर्थ गरजेवेळी सत्तेसोबत गेले पाहिजे, अशा सूचना अप्रत्यक्षपणे पक्षाच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे यांच्याकडून आल्याने निराश झालेल्या जगताप यांनी राष्ट्रवादीची साथ सोडण्याचे ठरवले. गेल्या दोन दिवसांत प्रशांत जगताप यांना राज्यातील प्रमुख पक्षांच्या नेत्यांचे फोन गेले. मूळ शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच काँग्रेस पक्षनेत्यांचेही जगताप यांना फोन केले. अखेर महायुतीच्याविरोधात ताकदीने लढणाऱ्या पक्षांमध्येच प्रवेश करेन, असे मनाशी ठामपणे ठरवून काँग्रेस पक्षासोबत पुढची वाटचाल सुरू करण्याचा निर्णय जगताप यांनी घेतला.
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईतील काँग्रेस भवनात प्रशांत जगताप यांनी पक्षात प्रवेश केला. त्यांच्या प्रवेशाला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार , काँग्रेस नेते नसीम खान, पुण्याचे काँग्रेस नेते मोहन जोशी उपस्थित होते. पुणे महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या तोंडावर जगताप यांचा पक्षप्रवेशाचा पक्षाला फायदा होईल, असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे. महायुतीविरोधात अगदी ताकदीने रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचा निर्धार प्रशांत जगताप यांनी पक्षप्रवेशावेळी बोलून दाखवला.
advertisement

प्रशांत जगताप यांनी राजीनामा का दिला?

भारतीय जनता पक्षाने अजित पवार यांच्यासोबत आघाडी करून पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत लढण्यासाठी नकार दिला. तेव्हा बेरजेचे राजकारण करण्यात माहीर असलेल्या अजित पवार यांच्याकडून एकत्र लढण्याचा प्रस्ताव अजित पवार यांनी दिला. त्यादिशेने हालचाली सुरू झाल्याने दोन्ही पक्षनेत्यांमध्ये चर्चेच्या फेऱ्या पार पडायला लागल्या. पुरोगामी पक्ष अशी ओळख असलेल्या राष्ट्रवादीने अजित पवार यांच्यासोबत जाऊ नये, असे प्रशांत जगताप म्हणणे होते. परंतु त्यांच्या मताकडे दुर्लक्ष करून पक्षनेतृत्व पाऊल टाकत असल्याचे लक्षात आल्यानंतर राजीनाम्याची तयारी जगताप यांनी केली. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी होणारच असे संकेत मिळताच जगताप यांनी मंगळवारी सायंकाळी पुणे महानगरपालिकेच्या प्रांगणात राजीनाम्याची घोषणा करून संविधानाच्या बाजूने लढाई सुरू ठेवणार असल्याचे सांगितले.
advertisement

कोण आहेत प्रशांत जगताप?

प्रशांत जगताप हे पुणे राष्ट्रवादीचे महत्त्वाचे नेते राहिले
त्यांनी पुणे महानगरपालिकेत नगरसेवक आणि महापौर म्हणूनही काम केले
शरद पवार आणि अजित पवार यांचे विश्वासू शिलेदार म्हणून त्यांची ओळख होती
विरोधात असताना सत्ताधाऱ्यांविरोधात अतिशय आक्रमकपणे आंदोलने करून त्यांना घाम फोडायचे
अगदी नीतीमुल्यांनी लढणारे कार्यकर्ते नेतृत्व अशी त्यांची ओळख
advertisement
त्यांचे वडील सुदामराव जगताप यांनी शरद पवार यांच्यासोबत काम केले होते
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
पुरोगामी विचारांना अंतिम मानून राष्ट्रवादी सोडली, प्रशांत जगतापांनी काँग्रेस निवडली, पक्षप्रवेश झाला!
Next Article
advertisement
Bharat Gogawale: भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कारवाईचं कारण काय?”
भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कार
  • भरत गोगावले यांचे पुत्र आणि शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास

  • विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने तब्बल तीन वेळा फेटाळला आहे.

  • आता महाड पोलीस कोणती कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

View All
advertisement