भाजपला घाम फोडलेल्या प्रणिता भालके एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार!

Last Updated:

पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसला. पंढरपूर नगर परिषदेच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालके या विजयी झाल्या.

एकनाथ शिंदे-प्रणिता भालके
एकनाथ शिंदे-प्रणिता भालके
विरेंद्र उत्पात, प्रतिनिधी, पंढरपूर : दिवंगत आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके हे एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत जाण्याची शक्यता आहे. शिंदे सेनेत प्रवेश करण्याच्या दृष्टीने भगीरथ भालके यांनी पावले उचलली असून नुकतीच त्यांनी माजी आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांची भेट घेतली.
पंढरपूर नगर परिषद निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला जोरदार धक्का बसला. पंढरपूर नगर परिषदेच्या तीर्थक्षेत्र विकास आघाडीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार प्रणिता भालके या विजयी झाल्या. भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराविरोधात त्यांनी दोन हात करून प्रतिस्पर्ध्यांना धूळ चारली. पंढरपूरमध्ये भाजपला घाम फोडणाऱ्या प्रणिता भालके शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रणिता भालके एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार

advertisement
भगीरथ भालके हे लवकरच एकनाथ शिंदे यांच्या भेटीलाही जाणार आहे. भगीरथ भालके यांच्या पत्नी प्रणिता भालके या नुकत्याच पंढरपूरच्या नगराध्यक्ष झाल्या. भालके नगराध्यक्ष झाल्यावर एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरचे नगराध्यक्ष आपला असल्याचे जाहीर केले. त्यामुळे भालके लवकरच एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करतील, अशी शक्यता निर्माण झाली आहे.

भालके गटाने गुलाल उधळला, आवताडे-परिचारक गटाला धक्का

advertisement
पंढरपूर नगरपरिषद निवडणुकीत भगीरथ भालके आणि यांच्या समर्थकांनी भाजपला धक्का देत तब्बल १४ वर्षांनंतर सत्तांतर घडवून आणले. दिवंगत नेते भारत भालके यांच्या स्नुषा प्रणिता भालके यांनी ११ हजारांच्या फरकाने विजय मिळवला. या निकालामुळे भाजपचे आमदार समाधान आवताडे आणि माजी आमदार प्रशांत परिचारक यांना मोठा झटका बसला.
भालके कुटुंब आधी काँग्रेस पक्षात होते. भारत भालके हे काँग्रेस पक्षाकडून आमदारही राहिले. त्यांच्या निधनानंतर भगिरथ भालके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसकडून विधानसभा निवडणूक लढवली. परंतु त्यांचा पराभव झाला. त्यानंतर आता स्थानिक आघाडी करून प्रणिता भालके नगर परिषद निवडणुकीला सामोरे गेल्या. भालके यांच्या विजयानंतर पंढरपूरमध्ये आपलाच नगराध्यक्ष विजयी झाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. त्याचवेळी त्यांनी भालके यांच्या शिवसेना पक्षप्रवेशाचे संकेत दिले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
भाजपला घाम फोडलेल्या प्रणिता भालके एकनाथ शिंदेंच्या सेनेत प्रवेश करणार!
Next Article
advertisement
Bharat Gogawale: भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कारवाईचं कारण काय?”
भरत गोगावलेंच्या मुलाला अटक होणार? कोर्टातून मोठी घडामोड, विकास गोगावलेंवरील कार
  • भरत गोगावले यांचे पुत्र आणि शिवसेना शिंदे गटाचे युवा सेना कोअर कमिटी सदस्य विकास

  • विकास गोगावले यांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने तब्बल तीन वेळा फेटाळला आहे.

  • आता महाड पोलीस कोणती कारवाई करणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

View All
advertisement