3 वर्षांतील 3 डिसेंबर अन् 3 व्हिलन्स! अक्षय खन्ना, बॉबी, फहाद; कोण आहे सर्वात श्रीमंत?
- Published by:Minal Gurav
Last Updated:
डिसेंबर 2023 ते 2025 दरम्यान एनिमल पुष्पा 2 आणि धुरंधर या सिनेमातील बॉबी देओल, फहाद फासिल, अक्षय खन्ना यांच्या व्हिलन भूमिकांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. तिघांपैकी कोण सगळ्यात जास्त श्रीमंत आहे माहितीये!
advertisement
advertisement
1 डिसेंबर 2023 रोजी रिलीज झालेल्या एनिमल या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर अक्षरशः वादळ उठवलं. रणबीर कपूर मुख्य भूमिकेत असला तरी या सिनेमात बॉबी देओलने साकारलेला अबरार हा खलनायक प्रेक्षकांच्या मनात घर करून गेला. कमी संवाद, बोलके डोळे आणि क्रूरता यामुळे बॉबी देओल पुन्हा एकदा चर्चेत आला. एनिमलने जगभरात तब्बल 900 कोटी रुपयांची कमाई करत ब्लॉकबस्टरचा शिक्का मिळवला.
advertisement
यानंतर 5 डिसेंबर 2024 रोजी पुष्पा 2 प्रेक्षकांच्या भेटीला आला. अल्लू अर्जुनचा जलवा कायम असतानाच या सिनेमात फहाद फासिलने साकारलेला भंवर सिंह शेखावत हा व्हिलन पुन्हा एकदा केंद्रस्थानी राहिला. त्याच्या अभिनयाने प्रेक्षक अक्षरशः चक्रावले. पुष्पा 2ने बॉक्स ऑफिसवर इतिहास रचत 1,642 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली.
advertisement
आता डिसेंबर 2025 मध्ये धुरंधर या सिनेमाने थिएटरमध्ये धुमाकूळ घातला आहे. या सिनेमात अक्षय खन्नाने साकारलेला रहमान डकैत हा खलनायक सध्या प्रचंड चर्चेत आहे. शांत, धोकादायक आणि बुद्धिमान असा हा व्हिलन प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवतोय. धुरंधरने अवघ्या काही दिवसांत 1000 कोटींच्या जवळपास मजल मारली आहे.
advertisement
advertisement
advertisement
advertisement
advertisement








