TRENDING:

Thyroid : थायरॉईड आणि वजन वाढण्याचा संबंध काय ? हायपोथायरॉडिझममुळे वजन वाढतं का ?

Last Updated:

हायपोथायरॉईडीझम म्हणजे काय आणि त्याचा वजन वाढण्याशी काय संबंध आहे ते जाणून घेऊ. हायपोथायरॉईडीझममधे, ग्रंथी कमी सक्रिय होतात आणि कमी हार्मोन्स तयार करतात, ज्यामुळे शरीराच्या कॅलरीज बर्न करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, ज्यामुळे पचन मंदावतं, आळस वाढतो आणि हळूहळू वजन वाढतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : थायरॉईडमुळे वजन वाढतं हे आपण ऐकून असतो पण का याचं वैज्ञानिक उत्तर माहित नसतं.
News18
News18
advertisement

थायरॉईडची समस्या ही फक्त मानेच्या ग्रंथीची समस्या नाही; तर शरीराच्या चयापचय, ऊर्जा उत्पादन आणि संप्रेरक संतुलनावर देखील याचा परिणाम होतो. थायरॉईड ग्रंथी योग्यरित्या संप्रेरक तयार करत नाही तेव्हा हायपोथायरॉईडीझम आणि हायपरथायरॉईडीझम होऊ शकतो.

हायपोथायरॉईडीझम म्हणजे काय आणि त्याचा वजन वाढण्याशी काय संबंध आहे ते जाणून घेऊ. हायपोथायरॉईडीझममधे, ग्रंथी कमी सक्रिय होतात आणि कमी हार्मोन्स तयार करतात, ज्यामुळे शरीराच्या कॅलरीज बर्न करण्याच्या क्षमतेवर परिणाम होतो, ज्यामुळे पचन मंदावतं, आळस वाढतो आणि हळूहळू वजन वाढतं.

advertisement

Sugary Drinks : शुगरी ड्रिंक्सपासून राहा दूर, मानसिक आजाराचं ठरतंय कारण

आयुर्वेदात, थायरॉईडचा संबंध कफ आणि वात दोषांच्या असंतुलनाशी जोडला जातो. कफ आणि वात दोषांच्या असंतुलनामुळे शरीरात जडपणा येतो, घसा आणि शरीराच्या इतर भागांत सूज येते आणि आळस येतो. यामुळे शारीरिक हालचाली कमी होतात आणि लठ्ठपणा वाढतो.

advertisement

त्रिकटू चूर्ण - बहुतेक थायरॉईडच्या समस्या वजन वाढण्यामुळे होतात आणि त्यावर नियंत्रण ठेवणं आवश्यक आहे. आयुर्वेदात यासाठी अनेक सोप्या पद्धती सांगितल्यात. वजन कमी करण्यासाठी निरोगी चयापचय असणं आवश्यक आहे. यासाठी सुंठ, काळी मिरी आणि लांब मिरचीपासून बनवलेले त्रिकूट पावडर वापरू शकता. त्रिकटू पावडर पचनक्रिया सुधारण्यासाठी आणि चयापचय मजबूत करण्यासाठी मदत करते. हे चूर्ण दररोज मधासोबत घेतलं जाऊ शकतं.

advertisement

गुग्गुळ कल्प - दुसरी पद्धत म्हणजे गुग्गुळ कल्प. गुग्गुळ कल्प हा वजन कमी करण्यासाठी सर्वात सोपा मार्ग मानला जातो. कारण तो यामुळे लसीका प्रणाली म्हणजेच lymphatic system सक्रिय करण्यास मदत होते. ज्यामुळे चरबी चयापचय सुधारण्यास मदत होते.

Alzheimer : वायू प्रदूषणाचा मेंदूला धोका, मेंदूच्या आरोग्यावर होतो गंभीर परिणाम

गुळवेल आणि कडुनिंबाचा रस - गुळवेल आणि कडुनिंबाचा रस यामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि रक्त शुद्ध करण्यास मदत होते. यामुळे थायरॉईड संप्रेरकांचं संतुलन राखण्यास आणि T3 आणि T4 चं उत्पादन वाढवण्यास मदत होते.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
गाडगे बाबाचं पुस्तक वाचलं, आयुष्य बदललं, अवलिया जिथे जातो तिथे स्वच्छता करतो!
सर्व पहा

लिंबू आणि मधाच्या पाण्यानं वजन कमी करण्यास मदत होते. सकाळी रिकाम्या पोटी हे पाणी प्यावं. चयापचय क्रियांना चालना मिळते, ज्यामुळे उर्जेची पातळी राखण्यास मदत होते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Thyroid : थायरॉईड आणि वजन वाढण्याचा संबंध काय ? हायपोथायरॉडिझममुळे वजन वाढतं का ?
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल