मुंबई : वेगवेगळ्या प्रकारचे स्ट्रीट फूड खायला प्रत्येकाला आवडतं. त्यामुळे मुंबईतील स्ट्रीट फूड विक्रते आता असे काही पदार्थ खवय्यांना सर्व्ह करताय ज्याचा आपण कधी विचारच केला नसेल. आजवर तुम्ही सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये सर्वसाधारण पणे डोसा किंवा मसाला डोसा खाल्ला असेल. पण कधी बटर चिकन डोसा खाल्लाय का? नॉर्थ आणि साऊथचा या अफलातून फ्युजनचा आस्वाद मुंबईकरांना आता घेता येणार आहे. मुंबईतील विक्रोळीच्या कन्नमवारनगर परिसरात असलेला हा फूड ट्रक खवय्यांचे विशेष लक्ष वेधून घेत आहे.
advertisement
कोण कोणते मिळतात प्रकार?
थालापथी असे या फूड ट्रकचे नाव आहे. विक्रोळीमधील चिराग साठे आणि तेजस सोनावणे या दोघांनी मिळून हा ट्रक सुरु केला आहे. चिराग हा हॉटेल मॅनेजमेंट झालेला शेफ आहे. त्याचप्रमाणे तेजस हा फायनान्स पदवीधर आहे. शिक्षण पूर्ण केल्यावर स्वतःचा एक व्यवसाय म्हणून हा फूड ट्रक या दोन मित्रांनी सुरु केला. या थालापथी फूड ट्रकवर विविध प्रकारच्या डोस्यानबरोबर फ्रॅप, बर्गर इत्यादी स्नॅक्स पदार्थाचा आस्वाद घेता येईल.
मलाई गोळा खावा तर इथंच, डोंबिवलीत फक्त 40 रुपयांपासून मिळतात 30 फ्लेवर, Video
या ठिकाणी 5 अशा युनिक पदार्थांचे फ्युजन मिळते, ज्याचा आपण कधी स्वप्नात ही विचार केला नसेल. चिकन मसाला डोसा, साऊथ स्पेशल चिकन चेट्टीनाड डोसा, चिकन कोल्हापुरी डोसा, बटर चिकन डोसा आणि अविश्वसनीय चिकन श्वारमा डोसा या ठिकाणी मिळतो. चिकन मसाला, बटर चिकन, चिकन श्वारमा हे पदार्थ आपण सहसा रोटी किंवा नान सोबत खाल्ले आहेत. पण डोस्यासोबत त्याची चव आणखीनच खुलून येते असे खवय्यांचे मत आहे. या डोस्याची किंमत 139 रुपये आहे.
घरगुती पद्धतीनं तयार केलेल्या मसाल्यांची करा या ठिकाणी खरेदी; वाढेल जेवणाची अधिक चव Video
काय आहे बटरचीकन डोसा ?
भारतातील नॉर्थ आणि साऊथचे युनिक फ्युजन एका ताटात एकत्र सर्व्ह होणारा हा एक पदार्थ आहे. अगदी साऊथच्या ऑथेंटिक पद्धतीने डोसा तयार केला जातो. बटरचीकन देखील नॉर्थमध्ये ज्या प्रकारे भाजलेल्या चिकन पासून तयार केले जाते अगदी त्याच प्रमाणे या ठीकाणी तयार केले जाते. रोटी किंवा नान प्रमाणेच डोश्यासोबत बटर चीकन सर्व्ह केले जाते, अशी माहिती शेफ चिराग साठे यांनी दिली आहे.