स्ट्रॉबेरी मिल्क शेकसाठी लागणारे साहित्य
10 ते 15 फ्रीज केलेल्या स्ट्रॉबेरी, साखर, व्हॅनिला आईस्क्रीम, दोन ग्लास दूध एवढे साहित्य आवश्यक आहे.
Amla Halwa Recipe : चव-पोषणाचं परफेक्ट कॉम्बिनेशन 'आवळा हलवा', एकदा बनवा अनेक दिवस खा! पाहा रेसिपी
स्ट्रॉबेरी मिल्क शेक रेसिपी
सगळ्यात पहिले आपण घेतलेल्या स्ट्रॉबेरी स्वच्छ धुवून घ्यायच्या. त्याला साधारणपणे दोन ते तीन तास फ्रीजरमध्ये ठेवायच्या. जेणेकरून आपला स्ट्रॉबेरी शेक चांगला होऊ शकतो. फ्रीजमधून काढलेल्या स्ट्रॉबेरी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या. त्यानंतर त्यामध्ये साखर टाकायची. साखर तुमच्या आवडीनुसार घ्यायची. स्ट्रॉबेरी आंबट असतील तर साखर जास्त वापरू शकता. तर तुम्ही डाएटचा विचार करत असाल तर साखरेऐवजी तुम्ही मध देखील वापरू शकता.
advertisement
स्ट्रॉबेरीसोबत त्यात व्हॅनिला आईस्क्रीम टाकायचे आहे. तसेच दोन ग्लास दूध घालायचे आहे. हे सर्व मिक्सरमधून एकदम बारीक करून घ्यायचं. गरजेनुसार यामध्ये अगदी आईसक्यूब देखील टाकता येतं. अशा पद्धतीने हा स्ट्रॉबेरी मिल्क शेक बनवून तयार होतो. मोजून पाच मिनिटांमध्ये ही रेसिपी तयार होते.
दरम्यान, तुम्हाला देखील काही हटके ट्राय करायचं असेल तर अगदी कमी साहित्यात घरच्या घरी तुम्ही स्ट्रॉबेरी मिल्कशेक बनवू शकता.





