मुंबई: मोदक हा महाराष्ट्रात व भारतात प्रचलित असलेला गोड खाद्यपदार्थ आहे. विशेष पूजाप्रसंगी गणपतीला मोदकांचा नैवेद्य दाखविला जातो. गणपती बाप्पाला मोदक खूप आवडतात आणि त्याशिवाय त्यांचा नैवेद्य अपूर्णच मानला जातो. मोदक दिसायला जितके सुंदर तितकीच चवीष्ट ही असतात. मोदक बनविण्याचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकीच नेहमीच्या मोदकांपेक्षा वेगळ्या प्रकारच्या मोदकांची अनोखी आणि चविष्ट रेसिपी म्हणजे पान गुलकंद मोदक होय. हेच पान गुलकंद मोदक कसे बनवायचे? याची रेसिपी मुंबईतील माधुरी आंबुरे यांनी सांगितली आहे.
advertisement
मोदकासाठी आवश्यक साहित्य
पान गुलकंद मोदकासाठी 10 ते 15 विड्याची पाने लागतात. 1 वाटी खिसलेले खबरे, साखर, कंडेन्स्ड मिल्क, साजूक तूप, गुलकंद या साहित्यात अगदी सोप्या पद्धतीनं मोदक बनवता येतात.
नॉनव्हेज प्रेमींसाठी पर्वणी, मुंबईत या ठिकाणी मिळतो स्पेशल बटर चिकन शोरमा, दरही अगदी कमी
मोदक बनवण्याची कृती
पहिल्यांदा विड्याची पाने स्वच्छ धुवून घेऊन त्यात 2 ते 3 चमचे कंडेन्स्ड मिल्क घालून घ्यावे. त्याची पेस्ट करून घ्यायची. मंद आचेवर एका पॅनमध्ये खोबरे, तूप घालून थोडे परतवून घ्यायचे. त्यात 3-4 चमचे साखर आणि पानाची पेस्ट घालून घ्याची. गॅस बंद करून सर्व मिश्रण मिक्स करून घ्यायचे. मिश्रण थोडे थंड झाल्यावर मोदकांचा साचा घेऊन त्याच्या दोन्ही बाजूने तूप लावून घ्यायचे. त्यात खोबऱ्याचे सारण व्यवस्थित भरून घेउन त्यात मधोमध गुलकंद भरायचा. साचा नीट बंद करून खालूनही सारण नीट भरून घेतले की हलक्या हाताने साचा उघडावा. आपला पान-गुलकंद मोदक तयार होतो.
दरम्यान, उन्हाळ्यात गुलकंद खाल्ल्याने शरीरातील उष्णता कमी होण्यास मदत होते. तेव्हा गणेश चुतर्थीला किंवा प्रसाद म्हणून पान गुलकंद मोदकाची रेसिपी नक्की ट्राय करू शकता. हे मोदक खायलाही अत्यंत चविष्ट लागतात.





