नॉनव्हेज प्रेमींसाठी पर्वणी, मुंबईत या ठिकाणी मिळतो स्पेशल बटर चिकन शोरमा, दरही अगदी कमी

Last Updated:

मुंबईतील साकी नाका येथे हा स्पेशल बटर चिकन शोरमा मिळतो. हा बटर चिकन शोरमा खूपच स्वादिष्ट आहे.

+
याठिकाणी

याठिकाणी मिळतो स्पेशल बटर चिकन शोरमा

प्रियांका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : चिकनपासून बनवलेले पदार्थ अनेकांना आवडतात. असे खूप लोक असतात, जे चिकनपासून बनवलेले पदार्थ खाण्यासाठी वेडे होतात. तुमच्यापैकीही अनेकांनी आतापर्यंत चिकनपासून बनवलेले चिकन फ्रँकी,चिकन रोल यासारखे पदार्थ खाल्ले असतील. मात्र, तुम्ही चिकनपासून तयार होणारा स्पेशल बटर चिकन शोरमा हा पदार्थ खाल्लाय का आणि तोही फक्तं 150 रुपयांत आणि मुंबईत. नाही ना. तर मग ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
advertisement
मुंबईतील साकी नाका येथे हा स्पेशल बटर चिकन शोरमा मिळतो. हा बटर चिकन शोरमा खूपच स्वादिष्ट आहे. तर मग हा स्वादिष्ट शोरमा नेमका कसा तयार होतो, याठिकाणी लोकांचा कसा प्रतिसाद आहे, याबाबत मोहम्मद एहमद यांनी माहिती दिली.
नवरा कामानिमित्त राहायचा घराबाहेर, बायको कायम घरी बॉयफ्रेंडला बोलवायची, शेवटी सत्य समोर आलं अन्...
बटर चिकन हा एक अतिशय लोकप्रिय आणि स्वादिष्ट पदार्थ आहे, जो संपूर्ण भारतात खूप प्रसिद्ध आहे. ज्यांना नॉनव्हेज खाण्याची आवड आहे त्यांच्यासाठी बटर चिकन हे नाव ऐकताच तोंडाला पाणी सुटते. हा बटर चिकन शोरमा इतर रेगुलर शोरमा पेक्षा जरा हटके स्टाईलने बनवला जातो.
advertisement
हा शोरमा बनवताना चिकनचे पिस बारीक कापून त्यामधे मसाला लावला जातो. नंतर रोलिंगचे चिकन कट करून ते भट्टीमध्ये ऑईल फ्राईंग करून बटरमध्ये कापलेले सर्व चिकन मसाल्यांमधे शिजवले जाते. नंतर मैद्याच्या रोटीत सर्व बनविलेले बटरचे चिकन आणि इतर सॅलडचे थर यामधे बीट, फ्रेन्च फ्राइस, कोबी स्लाईड आणि इतर चटणी लावून रोलिंग करून बनविले जाते.
advertisement
शेतकऱ्यांसाठी या पिकाची शेती म्हणजे ATM, 120 दिवसात पिक तयार अन् मिळवा भरपूर उत्पन्न
हे एक लोकांचे मनपसंत स्ट्रीट फूड आहे. त्यामुळे याठिकाणी ग्राहक आवडीने या बटर चिकन शोरमाची चव चाखण्यासाठी गर्दी करतात. विशेष म्हणजे हा शोरमा फक्त 150/- रुपयांमध्ये मिळतो. चव आणि दर फायद्यात असल्याने त्यामुळेच स्ट्रीट फूड खाद्य प्रेमी इथे आवर्जून येतात, असेही त्यांनी सांगितले.
मराठी बातम्या/मुंबई/
नॉनव्हेज प्रेमींसाठी पर्वणी, मुंबईत या ठिकाणी मिळतो स्पेशल बटर चिकन शोरमा, दरही अगदी कमी
Next Article
advertisement
OTT Series: ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
ओटीटीवरची 8 एपिसोडची हॉरर-थ्रिलर सीरीज, पाहून अंगावर येईल काटा
    View All
    advertisement