गाजराचा हलवा साहित्य
गाजर – ४ मध्यम आकाराची (शिजवून घेतलेली), दूध – १ कप, साखर – ½ कप (चवीनुसार), तूप – २ टेबलस्पून, वेलची पूड – ½ टीस्पून, काजू, बदाम – २ टेबलस्पून (कापलेले), मनुका – १ टेबलस्पून आदी.
मिरचीचा ठेचा खाऊन कंटाळा आलाय? तुरीच्या दाण्यांपासून बनवा खास रेसिपी, खाल आवडीने
advertisement
गाजराचा हलवा कृती:
1) प्रथम गाजर स्वच्छ धुवून मध्यम आकाराचे कापून ते कुकरमध्ये ३-४ शिट्ट्या करून शिजवून घ्या.
2) शिजवून झाल्यावर मग कढईत १ टेबलस्पून तूप गरम करून त्यात वेलची पूड, काजू, बदाम आणि मनुका घालून चांगले लालसर भाजून घ्या.
3) मग त्यात शिजवलेले गाजरचे तुकडे घाला. त्यानंतर त्यात दूध घालून मिश्रण मॅश करून ते शिजू द्यावे.
4) मध्यम आचेवर ५–७ मिनिटे गाजर परतावीत. दूध आटत येईपर्यंत मधूनमधून ढवळत राहावे.
5) दूध आटल्यावर त्यात साखर घालावी. साखर घातल्यानंतर हलव्यात थोडे पाणी सुटेल ते पूर्णपणे आटेपर्यंत शिजवावे.
6) हलवा कढईच्या कडांपासून सुटू लागला की गॅस बंद करावा.
झटपट टिप्स
मावा वापरल्यास हलवा आणखी स्वादिष्ट होतो. अवघ्या २०–२५ मिनिटांत तयार होणारा हा गाजर हलवा सणासुदीला, पाहुण्यांसाठी किंवा अचानक गोड खाण्याची इच्छा झाली तरी उत्तम पर्याय ठरतो. गरमागरम गाजर हलवा सर्व्ह करून घरच्यांची आणि पाहुण्यांची मनं नक्की जिंकता येतील.





