अमरावती : उकडपेंडी, पोहे, उपमा, शेवया हे पदार्थ आपण नाश्त्यासाठी नेहमी करतो. पण आज आपण काही वेगळी रेसिपी बघणार आहोत. ती म्हणजे तांदळाच्या पिठाचा उपमा. हा उपमा खायला खूप टेस्टी लागतो आणि झटपट होणारा पदार्थ आहे. सकाळच्या आणि सायंकाळच्या नाश्त्यासाठी तुम्ही तांदळाच्या पिठाचा उपमा बनवू शकता. तांदळाच्या पिठाचा उपमा बनवण्याची रेसिपी अमरावतीमधील गृहिणी जया भोंडे यांनी सांगितली आहे.
advertisement
तांदळाच्या पिठाचा उपमा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 वाटी तांदळाचे पीठ, कांदा, टोमॅटो, कडीपत्ता, कोथिंबीर, जिरे, हिरवी मिरची, लाल तिखट, हळद, मीठ, तेल, शेंगदाणे, वाटणे/ तुरीचे दाणे हे साहित्य लागेल.
कडाक्याची थंडी आणि गरमागरम तुरीचे कढी गोळे, विदर्भ फेमस रेसिपीचा सोप्पा VIDEO
तांदळाच्या पिठाचा उपमा बनवण्यासाठी कृती
सर्वात आधी कढईत तेल आणि इतर साहित्य घालून फोडणी तयार करून घ्यायची. त्यासाठी सर्वात आधी जिरे त्यानंतर कांदा, शेंगदाणे, तुरीचे दाणे आणि लाल तिखट आणि इतर साहित्य टाकून ते शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात टोमॅटो टाकून ते सुद्धा नरम होईपर्यंत शिजवून घ्यायचे आहे.
त्यानंतर त्यात तांदळाचे पीठ टाकून मिक्स करून घ्यायचे आहे. तांदळाचे पिठ भाजून घ्यायचे आहे. पिठ भाजून घेईपर्यंत उपम्यामध्ये टाकण्यासाठी पाणी गरम करून घ्यायचे आहे. त्यानंतर भाजून घेतलेल्या तांदळाच्या पिठामध्ये गरम पाणी घालायचे आहे. ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे.
तांदळाचे पिठ शिजण्यासाठी पाणी थोडे जास्त प्रमाणात लागत असल्याने लागते तेवढे पाणी तुमच्या अंदाजानुसार टाकायचे आहे. त्यानंतर थोडा वेळा झाकण ठेवून वाफ काढून घ्यायची आहे. त्यानंतर उपमा खाण्यासाठी तयार होतो. त्यावर कोथिंबीर घालून तुम्ही हा उपमा ज्वारीचे पापड आणि लोणचे यासोबत खाऊ शकता. त्याचबरोबर तांदळाच्या पिठापासून अनेक पदार्थ बनवता येतात. त्यापैकी सर्वात सोपी पदार्थ हा आहे. कमीत कमी साहित्य वापरून चविष्ट असा पदार्थ तांदळाचा पिठापासून बनवता येतो.