मुंबई : पानाचा विडा म्हटलं की आपल्या सगळ्यांचीच वेगवेगळी पसंती असते. कोणाला गोड पान आवडतं, कोणाला चॉकलेट पान तर कोणाला साधं मसाला पान. कारण आज काल विड्यामध्येही बरेच फ्लेवर आले आहेत. पण त्यातल्या त्यात एक फेमस असलेलं पान म्हणजे फायर पान आहे. जे शक्यतो प्रत्येकाला एकदा तरी खाऊन बघायचचं असतं. आणि हल्ली तर शक्यतो प्रत्येक पानवाल्याकडे फायर पान हे मिळतंच. नेहमीच्या पानासारखं हे पान बनवून त्यात शेवटी असा एक मसाला टाकला जातो. ज्यामुळे त्यात हलकीशी ज्योत पेटते आणि ते पान तोंडात घालताच ती विझून जाते. पण हे फायर पान नेमकं बनवलं कसं जातं याचीच रेसिपी मुंबईतील पान विक्रते सत्यम यांनी सांगितली आहे.
advertisement
फायर पान बनवण्यासाठी लागणारे साहित्य
(प्रत्येकाकडे या साहित्यांमध्ये थोडाफार बदल असू शकतो.)
खाऊचं पान, चुना, काथ, गोड मसाला, गुलकंद, किसमिस, खोबऱ्याचा किस, तर काहीजण टरबुजाच्या बियाही टाकतात, लवंग, सुपारी (आवश्यकता असल्यास), बडिशोप, गोड अन् कलरफूर असणारी फ्लेवरची बडिशोप, आणि फायर पानचा मसाला किंवा कापुराचा चुरा हे साहित्य लागेल.
ओरिओ फ्लेवर ते मॅंगो चटणी पान; चक्क ट्रकवर मिळतायत 40 प्रकार, पाहा PHOTOS
फायर पान बनवण्यासाठी कृती
सुरुवातीला पानाला चांगल धुवून घेऊन त्याला सुरुवातीला चुना लावला जातो. त्यानंतर काथाची पावडर टाकली जाते. नंतर ज्यांना जशी सुपारी हवी असेल तशी किंवा ज्यांना नको हवा असल्यास विनासुपारीही पान बनवलं जातं. त्यानंतर त्यात गुलकंदपासून ते किश मिसपर्यंत सगळ्या प्रकारचे साहित्य टाकले जातात. आणि शेवटी ठरलेला फायरपानचा मसाला टाकला जातो आणि त्यावर हलकीशी ज्योत पेटवली जाते. पण ही ज्योत एवढी हलकी असते की ते पान तोंडात घालताच ती विझून जाते.
बरेच जण असंही म्हणतात की हे पान खाल्ल्यावर हलकीशी कापूराची चव येते किंवा त्या मसाल्याला तसा हलकासा सुगंध असतो. त्यामुळे हे फायर पान तोंडांत घालताच ती ज्योत विझते आणि एक वेगळ्याचं फ्लेवरची चव लागते. पण त्यामुले तोंडाला कोणतीही इजा होत नाही किंवा जिभ भाजत नाही. त्यामुळे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच या पानाचा आस्वाद घेऊ शकतात.
मलाई गोळा खावा तर इथंच, डोंबिवलीत फक्त 40 रुपयांपासून मिळतात 30 फ्लेवर, Video
प्रत्येक पानवाल्याकडे फायर पानचा मसाला मात्र वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. काही जण हा फायर पानचा मसाला आयताच बाजारातून विकत आणतात तर काही जण स्वत: हे मिश्रण बनवतात. तसेच काही जण हे पान बनवून झाल्यावर लवगांचा चुरा किंवा कापुरच्या चुऱ्याची चिमुटही टाकताना दिसतात. पण त्याने शरिराचं नुकसान न होता झालाच तर, फायदाच होतो. त्यामुळे प्रत्येक पानवाला हीच रेसिपी किंवा ट्रीक वापरत असेल असं नाही प्रत्येकाची एक सिक्रेट रेसिपी नक्कीच असते.