छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराची ओळख ऐतिहासिक शहर म्हणून आहे. शहरामध्ये अनेक पर्यटन स्थळ आहेत हे बघून अनेक पर्यटक भारावून जातात. शहरातली अजून एक खासियत म्हणजे मोहम्मद-बिन-तुगलक यांच्या काळात त्यांच्या सैन्यासाठी एक खास नान रोटी ही तयार केली जात होती. ही नान रोटी शहरामध्ये अत्यंत प्रसिद्ध आहे. या नान रोटीला आजही मोठ्या प्रमाणात मागणी आहे. ही नान रोटी कशी तयार केली जाते याची माहिती छत्रपती संभाजीनगरमधील नान रोटी विक्रते सय्यद नईमन यांनी दिली आहे.
advertisement
कशी बनवली जाते नान रोटी?
ही नान रोटी चार-पाच दिवस टिकते. विशेष करून नॉनव्हेज सोबत ही नान रोटी खाल्ली जाते. नान रोटी तुम्ही चहा सोबत पण खाऊ शकता. किंवा तुम्ही इतर कोणत्याही भाजी सोबत ही नान रोटी खाऊ शकतात. ही नान रोटी प्रामुख्याने मैदा आणि गव्हाच्या पिठापासून बनवली जाते. सर्वप्रथम मैदा आणि गव्हाच्या पिठामध्ये मीठ, ईस्ट, सोडा आणि पाणी टाकून याचा छान गोळा मळून घेतला जातो. त्यानंतर हा गोळा थोडा वेळ बाजूला ठेवून त्याच्यानंतर त्याचे छोटे छोटे गोळे करून छोटी पोळी लाटून घ्यायची.
नाचणीपासून चविष्ट आणि पौष्टिक आंबोळी घरीच कशी बनवाल? ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
त्या रोटीला हाताने मोठे करून घ्यायचे. नंतर त्याला पाणी लावून त्यावरती हळदीचा कलर लावायचा आणि नंतर ती रोटी तंदूरमध्ये शिजवण्यासाठी ठेवायची. शिजवून झाली की तिला काढून त्याच्यावरती तूप किंवा बटर लावून ही नान रोटी तयार होते. तसंच ही नान रोटी तुम्ही गॅस वरती करू शकत नाही त्याला विशेष एक तंदूर लागतं. त्यातच तुम्ही नान रोटी तयार करू शकता, असं विक्रते सय्यद नईमन यांनी सांगितले.
उपवासाला खावा भगरीचे लाडू, विदर्भातील रेसिपी माहितीये का?
शहरातल्या नान रोटीची किंमत ही 6 रुपये ते 12 रुपयांपर्यंत आहे. तसेच या रोटीला मोठ्या प्रमाणात मागणी देखील आहे. तसेच ही नान रोटी तुम्ही बरेच दिवस थंड करून स्टोर करून ठेवू शकता. अशा पद्धतीने ही नान रोटी तयार केली जाते, असंही विक्रते सय्यद नईमन यांनी सांगितले.