Video: उपवासाला खावा भगरीचे लाडू, विदर्भातील रेसिपी माहितीये का?
- Published by:News18 Marathi
Last Updated:
भगरीचे लाडू ही रेसिपी बनवण्यासाठी देखील अगदी सोपी असून कोणीही बनवू शकते.
अमिता शिंदे, प्रतिनिधी
वर्धा: विदर्भाच्या खाद्य संस्कृतीत विविध पदार्थ प्रसिद्ध आहेत. त्यातीलच एक रेसिपी म्हणजे उपवासाचे भगरीचे लाडू होय. ही रेसिपी अगदी कमी साहित्यात आणि कमी वेळेमध्ये बनवून तयार होते. त्यामुळे अनेक लोक उपवासाच्या दिवशी हे लाडू खाणे पसंत करतात. या लाडूची चव रव्याच्या लाडू प्रमाणे लागते. ही रेसिपी बनवण्यासाठी देखील अगदी सोपी असून कोणीही बनवू शकते. वर्धा येथील गृहिणी शोभा सोनकुसरे यांनी भगरीचे लाडू कसे बनवावे? यासंदर्भात रेसिपी सांगितली आहे.
advertisement
भगरीचे लाडू बनविण्यासाठी साहित्य
एक वाटी भगर, एक वाटी साखर, साजूक तूप, विलायची आणि ड्रायफ्रूट्स हे साहित्य लागेल.
भगरीचे लाडू बनविण्यासाठीची कृती
सर्वप्रथम भगर मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर एका कढईमध्ये साजूक तूप घालायचं. तूप गरम झाल्यावर त्यात भगर ऍड करून चांगलं भाजून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिटं भगर तुपात भाजून होईपर्यंत एका साईडने आपल्याला पाक तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी एका छोट्या गंजामध्ये थोडसं पाणी ऍड करून त्यात एक वाटी साखर घालायची आहे. (त्यातच वेलची पुडही ऍड करू शकता किंवा नंतर ऍड केली तरीही चालेल)
advertisement
पाक तयार होण्यासाठी 5 ते 10 मिनिटे लागतील. तोपर्यंत भाजून झालेली भगर एका ताटात थंड होण्यासाठी काढायची. भगर थंड झाल्यावर साखरेचा तयार केलेला साधा पाक त्यात ऍड करायचा आहे. त्यानंतर चांगलं एकत्र करून घ्यायचं आहे. त्यात ड्रायफ्रूट्स आणि वेलची ऍड करता येईल. आता हे लाडू वळून घ्या आणि सजावट करून तुम्ही त्याला सर्व्ह करू शकता.
Location :
Wardha,Maharashtra
First Published :
January 23, 2024 4:43 PM IST