नाचणीपासून चविष्ट आणि पौष्टिक आंबोळी घरीच कशी बनवाल? ही सोपी रेसिपी लगेच नोट करा

Last Updated:

शरीरासाठी अपायकारक नसलेला पौष्टिक असा हा पदार्थ असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खात असतात.

+
News18

News18

साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : साऊथ इंडियन पदार्थांमध्ये आंबोळी हा पदार्थ सर्वत्र आवडीने खाल्ला जातो. शरीरासाठी अपायकारक नसलेला पौष्टिक असा हा पदार्थ असल्यामुळे लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वजण खात असतात. त्यात नाचणी पासून बनवलेल्या आंबोळी या अजूनच पौष्टिक असतात. मुळात विविध घटकांनी युक्त नाचणी हे तृणधान्य शरीरासाठी अत्यंत पोषक घटक असल्यामुळे त्याच्यापासून बनवलेल्या आंबोळी या चविष्ट आणि पौष्टिक बनतात. त्यामुळेच कोल्हापूरच्या वैशाली भोसले यांनी नाचणीपासून आंबोळी कशा पद्धतीने बनवता येतात, याची पाककृती सांगितली आहे.
advertisement
काय काय लागते साहित्य?
नाचणीच्या या आंबोळी बनवण्यासाठी सर्वप्रथम चांगल्या प्रतीची नाचणी लागतील. त्यासोबत थोडे मेथी दाणे आणि पोहे लागतील. तर पीठ भिजवून आंबवण्यासाठी ठेवताना कोरडे नाचणीचे तयार करून घेतलेले पीठ, भिजवलेली उडीद डाळ, थोडा गुळ आणि चवीपुरते मीठ हे साहित्य आवश्यक आहे, असे वैशाली भोसले यांनी सांगितले आहे.
advertisement
1) पहिल्यांदा नाचणी स्वच्छ धुऊन कापडात बांधून मोड काढून घ्यावी. तर पुढे ही मोड आलेली नाचणी पुन्हा एकदा धुवून उन्हात वाळवून घ्यावी.
2) वाळवलेल्या नाचणीचे पीठ तयार करताना त्यामध्ये थोडे मेथीचे दाणे आणि भाजलेले पोहे मिसळून नाचणीचे कोरडे पीठ तयार करून घ्यावे.
advertisement
3) आंबोळी साठी पीठ भिजवताना नाचणीचे कोरडे पीठ, साधारण तासभर भिजवलेली उडीद डाळ, एक चमचा गुळ आणि चिमूटभर मीठ घ्यावे.
4) साधारण चार ते पाच मध्यम आकाराच्या आंबोळी बनवण्यासाठी दोन वाटी नाचणीचे पीठ आणि एक वाटी उडीद डाळ असे प्रमाण ठेवावे.
5) रात्रभर हे पीठ आंबवण्यासाठी ठेवल्यानंतर सकाळी मस्त आंबोळी बनवता येतात.
advertisement
6) आंबोळी सोबत खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी किंवा बटाटा भाजी देखील बनवून घेऊ शकता.
Kadhi Gole Recipe : 1 वाटी चण्याची डाळ, 2 चमचे बेसन, 10 मिनिटांत तयार होतील चविष्ट विदर्भ स्टाईल कढी गोळे, रेसिपी पाहा
 दरम्यान नाचणी हे आपल्या शरीरासाठी एक आवश्यक तृणधान्य आहे. नाचणीमुळे तांदूळ आणि गहू यांच्यापेक्षा नाचणी हा एक आदर्श पर्याय मानला जातो. तर अनेक रोगांना प्रतिबंध करण्यासाठी देखील नाचणी प्रभावीपणे मदत करते. त्यामुळेच नाचणीपासून बनवलेल्या आंबोळी शरीरासाठी आरोग्यदायी ठरतात, असेही भोसले यांनी सांगितले आहे.
advertisement
 
view comments
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
नाचणीपासून चविष्ट आणि पौष्टिक आंबोळी घरीच कशी बनवाल? ही सोपी रेसिपी लगेच नोट करा
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement