पान सरबत बनवण्यासाठी लागणारे साहित्य
5 पान, 1 वाटी साखर, 25 ग्राम भिजवलेली सोप, वेलची आणि लिंबू हे साहित्य लागेल.
Mutton : अस्सल गावाकडील कारणाचे मटण, 8 वर्षांपासून प्रसिद्ध, एकदा खाल तर चव विसरणार नाहीत, Video
advertisement
पान सरबत बनवण्याची कृती
सर्वात आधी पान, सोप आणि वेलची मिक्सर मधून बारीक करून घ्यायची आहे. त्याचं छान असं सॉफ्ट मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. त्यानंतर एका भांड्यात 1 पाणी टाकून घ्यायचं आहे. ते पाणी गरम होऊ द्यायचं आणि त्यात साखर टाकून घ्यायची. साखर विरघळली की त्यात पानाचं मिश्रण टाकून ते मिक्स करायचं. त्यानंतर ते घट्टसर होईपर्यंत शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात लिंबाचा रस टाकून घ्यायचा आणि आणखी 2 मिनिट शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर गॅस बंद करून ते मिश्रण थंड होऊ द्यायचं आहे. थंड झालं की काचेच्या बरणीत भरून ठेवू शकता.
सरबत तयार करताना थंड पाणी घेऊन त्यात 2 चमचे पानाचं मिश्रण टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर 2 बर्फाचे तुकडे टाकून घ्यायचे आहे. चवीनुसार लागत असल्यास तुम्ही मीठ सुद्धा घेऊ शकता. टेस्टी आणि आरोग्यवर्धक सरबत तयार होईल. हे सरबत तुम्ही साहित्य न शिजवता सुद्धा बनवू शकता. जर तुम्हाला मिश्रण तयार करून ठेवायचे असेल तर ते शिजवणे गरजेचे आहे.