आंब्याचा मुरंबा साहित्य
कच्च्या कैऱ्या - 1 वाटी साखर किंवा गूळ - 1 वाटी (कैरीच्या आंबटपणानुसार)
वेलची पूड, लवंग (ऐच्छिक)
चिमूटभर हळद (रंगासाठी)
जायफळ लिंबाचा रस (पर्यायी)
Health Tips : हिवाळ्यात तुमचे ओठ फुटतात? हे करा घरगुती उपाय, सोप्या टिप्सचा Video
आंब्याचा मुरंबा कृती
कैरी तयार करणे: कैरी धुवून, साल काढून, किसनीत किंवा मिक्सरमध्ये किसून घेणे.
advertisement
मिश्रण तयार करणे: एका जाड बुडाच्या भांड्यात थोडे तेल किंवा तूप टाकून किसलेली कैरी, साखर/गूळ, चिमूटभर हळद आणि थोडे पाणी (गरज वाटल्यास) एकत्र करा.
शिजवणे: मध्यम आचेवर हे मिश्रण उकळू द्या. गूळ विरघळल्यावर अधूनमधून ढवळत राहा, जेणेकरून ते खाली लागणार नाही.
घट्ट करणे (चाचणी): मिश्रण घट्ट होऊ लागल्यावर त्यात वेलची पूड आणि लवंग घाला. मिश्रण मधा इतकं घट्ट होईपर्यंत शिजवा.
थंड करणे: गॅस बंद करा. मिश्रण थंड झाल्यावर ते आणखी घट्ट होते. तुम्हाला पातळ हवा असल्यास, मधापेक्षा थोडं पातळ असताना गॅस बंद करा.
साठवणे: पूर्ण थंड झाल्यावर, स्वच्छ, कोरड्या काचेच्या बरणीत भरा आणि शक्यतो फ्रीजमध्ये ठेवा, म्हणजे तो जास्त काळ टिकेल.
टीप: पिकलेल्या आंब्याचा मुरंबा बनवताना आंबटपणा कमी असतो, त्यामुळे साखर/गूळ कमी वापरावा, आणि चवीसाठी केशर किंवा वेलची घालू शकता.





