यासाठी लागणारे साहित्य
एक वाटी बाजरी घ्यायची. ती भाजून आणि त्याला बारीक दळून घ्यायचं. मिक्सरमधून काढले तरी चालेल. मीठ, तिखट, हळद, जिरे, मोहरी, तिळ, लसूण आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर एवढे साहित्य लागेल.
Superfood Bajri Bhakri: हिवाळ्यात नक्की करा आहारात समावेश, एक-दोन नाही असंख्य फायदे!
advertisement
कृती:
सगळ्यात पहिले गॅसवर कुकर ठेवायचा. त्यानंतर त्यामध्ये तेल घालायचं. तेल गरम झाले की जिरे, मोहरी टाकायचं. जिरे, मोहरी तडतडली की त्यामध्ये लसूण टाकायचा. लसूण लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आणि त्यानंतर गरम पाणी टाकायचे. हे एका वाटीला दोन वाट्या पाणी असं प्रमाण घ्यायचं. त्यामध्ये टाकायचं.
गरम पाणी टाकल्यानंतर त्यात अर्धा चमचा हळद, दोन चमचे तिखट (तिखट तुम्ही तुमच्या चवीप्रमाणे टाकू शकता), तिळ टाकून घ्यायचे. याला उकळी येऊ द्यायची. उकळी आल्यानंतर आपण जे बाजरी बारीक करून घेतलेली आहे, त्यामध्ये टाकून त्याला व्यवस्थित फेटून घ्यायचं. त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या गाठी राहता कामा नये. फेटून झाल्यानंतर त्यामध्ये हिरवी कोथिंबीर टाकायची आणि कुकर वरती दोन शिट्ट्या करून घ्यायच्या मध्यम आचेवरती.
दोन शिट्ट्या झाल्यानंतर गॅस बंद करून टाकायचा. त्याला थोडं थंड होऊ द्यायचं आणि कुकर उघडून सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं. अशा पद्धतीने तुमची ही बाजरीची उकड किंवा बाजरीच्या कन्या बनवून तयार होतात. तर तुम्ही देखील एकदा घरी नक्की ट्राय करा.





