केळीचे चिप्स बनवण्यासाठी लागणारे साहित्य
कच्ची केळी, तळण्यासाठी तेल, लाल तिखट, मीठ आणि आमचूर किंवा चाट मसाला हे साहित्य लागेल.
केळीचे चिप्स बनवण्याची कृती
केळीचे चिप्स बनवण्यासाठी सर्वात आधी केळीची साल काढून घ्यायची आहे. त्यासाठी दोन्ही बाजूने केळीचे टोक कापून घ्या. त्यानंतर केळी सोलून घ्यायची आहे. त्यानंतर राहिलेला भाग कटर किंवा चाकूच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे. केळी सोलून ठेवली तर ती काळी पडतात. त्यामुळे सोलून झाली की पाण्यात ठेवायची. किंवा तुम्ही एक-एक केळी सोलून सुद्धा चिप्स पाडू शकता.
advertisement
आता ब्रेडशिवाय बनवा हेल्दी सँडविच, रव्याची सोपी रेसिपी माहितीये का?
चिप्स पाडण्यासाठी पाण्यातील केळी पुसून घ्यायची आहे. त्यानंतर कढईत तेल गरम करायला ठेवायचं आहे. तेल गरम होत आलं की, चिप्स डायरेक्ट तेलात पाडून घ्यायचे आहे. बाहेर जर आपण चिप्स पाडले तर ते काळे होतात आणि चिकटतात. त्यामुळे डायरेक्ट तेलात चिप्स पाडून घ्यायचे आहे. त्यानंतर हे चिप्स कुरकुरीत होतपर्यंत तळून घ्यायचे आहे.
चिप्स शिजले की, तेलात जास्त तळतळत नाहीत. तेव्हा समजायचं की चिप्स तयार झाले आहेत. सर्व चिप्स तळून झाल्यानंतर त्यात मीठ, लाल तिखट आणि आमचूर पावडर टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. केळीचे कुरकुरीत आणि चटपटीत चिप्स तयार झाले असतील.