बेसन लाडू साहित्य
बेसन लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य म्हणजे बेसन, साखरेची पावडर, तूप, वेलची पावडर आणि मनुके. तुम्हाला जितके बेसन लाडू बनवायचे आहेत, त्यानुसार या सर्व साहित्याचं प्रमाण घ्या.
Diwali 2025 : दिवाळीला फराळ बनवताय? पदार्थ तेलात की तुपात तळलेले चांगले? महत्त्वाच्या टिप्सचा Video
बेसन लाडू बनवण्याची कृती
advertisement
बेसन लाडू तयार करण्यासाठी सर्वप्रथम कढई गरम करून घ्यावी. त्यात तूप टाकून वितळू द्यावे. तूप पूर्णपणे वितळल्यावर थोडंथोडं करून बेसन कढईत घालून सतत हलवत भाजावे. सुरुवातीला गॅसची फ्लेम मध्यम ठेवावी आणि साधारण 10 मिनिटांनी फ्लेम मंद करावी. उरलेले तूप घालून बेसन 20–25 मिनिटे परतत भाजावे. बेसन हलकं सोनेरी रंगाचा आणि सुवासिक झाल्यावर गॅस बंद करावा. भाजलेलं बेसन एका प्लेटमध्ये काढून पूर्णपणे थंड होऊ द्यावे.
भाजलेलं बेसन पूर्णपणे थंड झाल्यावर त्यात पाऊण बाउल साखरेची पावडर आणि पाव टेबलस्पून वेलची पावडर घालावी. सगळं नीट मिक्स करून घ्यावे. नंतर याचे लाडू वळून घ्यावे. अशा प्रकारे मऊ, आणि तोंडात विरघळणारे बेसन लाडू तयार होतात.