TRENDING:

Diwali Recipe : लहानांपासून मोठ्यांना आवडेल, दिवाळीला घरीच बनवा चॉकलेट बर्फी‎, रेसिपीचा Video

Last Updated:

अगदी झटपट बनून देखील चॉकलेट बर्फी तयार होते. त्यासोबतच ही चॉकलेट बर्फी करण्यासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागतं.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
 छत्रपती संभाजीनगर : दिवाळीमध्ये आपण सर्वजण छान गोड पदार्थ करत असतो. आपल्याला सर्वांना अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत, सर्वांना चॉकलेट खायला खूप आवडतात. अगदी झटपट बनून देखील चॉकलेट बर्फी तयार होते. त्यासोबतच ही चॉकलेट बर्फी करण्यासाठी आपल्याला अगदी कमी साहित्य लागतं. तर चॉकलेट बर्फी कशी करायची याची रेसिपी आपल्याला ऋतुजा पाटील यांनी सांगितली आहे.
advertisement

चॉकलेट बर्फीसाठी लागणारे साहित्य

‎व्हाईट चॉकलेट (यासाठी तुम्ही व्हाईट कंपाऊंडचा देखील वापर करू शकता), मिल्क पावडर, टूटी फ्रुटी, वेलचीपूड, थोडंसं तूप, बदामाचे काप एवढंच साहित्य या करता लागणार आहे.

Diwali Skin Care : दिवाळीत चंद्रसारखा चमकेल तुमचा चेहरा! फक्त वापरा 'हे' 5 घरगुती फेस पॅक..

‎‎चॉकलेट बर्फी करण्याची कृती

advertisement

‎सगळ्यात पहिले डबल बॉइलिंग मेथडने जे व्हाईट चॉकलेट आहे ते मेल्ट करून घ्यायचं. चॉकलेट चांगले मेल्ट झाल्यानंतर त्यामध्ये आपण घेतलेलं तूप टाकायचं. एक ते दीड चमचा तूप टाकून घ्यायचं. एकत्र केल्यानंतर त्यामध्ये मिल्क पावडर टाकायचं. ते एकजीव करून घेतल्यानंतर त्यामध्ये आपल्या आवडीनुसार टूटीफ्रुटी टाकायची. थोडीशी वेलची पूड टाकायची. हे सर्व मिश्रण एकत्र करून घ्यायचं. त्यानंतर एका ताटलीला तूप लावून घ्यायचं. आपण तयार केलेलं हे जे मिश्रण आहे ते त्यामध्ये टाकायचं. वरतून थोडेसे गार्निशिंगसाठी बदामाचे काप टाकून घ्यायचे.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लहानांपासून मोठ्यांना आवडेल, दिवाळीला घरीच बनवा चॉकलेट बर्फी‎, रेसिपीचा Video
सर्व पहा

‎तयार केलेलं मिश्रण आपण एक पाच ते दहा मिनिटांसाठी किंवा अर्धा तासासाठी फ्रीजमध्ये सेट व्हायला ठेवून द्यायचं. त्यानंतर त्याचे काप करून घ्यायचे. अशा पद्धतीने ही बर्फी बनवून तयार होते. बनवायला फक्त दहा मिनिटे लागतात, झटपट तयार होते. तर तुम्ही देखील दिवाळीला ही बर्फी नक्की ट्राय करा.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
Diwali Recipe : लहानांपासून मोठ्यांना आवडेल, दिवाळीला घरीच बनवा चॉकलेट बर्फी‎, रेसिपीचा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल