पुणे : सध्या सगळीकडे एकदम कडक उन्हाळा सुरू झालाय. या ऋतूत जास्त जेवण जात नाही वा ते खाण्याची इच्छा होत नाही. त्यामुळे उन्हाळाच्या दिवसांमध्ये आपल्या जेवणात लोणची, पापड चटणी सोबत जेवणाची लज्जत वाढवण्यासाठी कोणतीही कोशिंबीर असणे अगदी आवश्यक आहेच. त्याशिवाय जेवणाचे ताट पुर्ण होऊ शकत नाही. त्यामुळे झटपट अशी काकडी आणि कांद्याची कोशिंबिरीची रेसिपी घरच्या घरीच कशी बनवायची याची रेसिपी पुण्यातील गृहिणी उमा पाटील यांनी सांगितली आहे.
advertisement
कांद्या आणि काकडीच्या कोशिंबीर रेसिपीसाठी साहित्य
उन्हाळ्यात शरीर थंड ठेवण्यासाठी काकडी सोबतच कांदा हा उपयोगी असतो. कांदा आणि काकडीपासून अगदी सोप्प्या पद्धतीने कांद्याची कोशिंबीर बनवण्यासाठी तुम्हाला
50 ग्रॅम घट्ट ताजे दही, 1 कांदा बारीक चिरलेला आणि लाल मीठ हे पदार्थ आवश्यक आहेत. तर काकडीची कोशिंबीर बनवण्यासाठी एक काकडी बारीक चिरलेली, ताजं दही, लाल मीठ, शेंगदाण्याचा कूट इतके पदार्थ आवश्यक आहेत.
आरोग्यदायी जीवनासाठी 'हिरवं रक्त', पाहा गव्हांकुर रस बनवायचा कसा? Video
कांद्याची कोशिंबीर कशी बनवाल?
1 कांदा बारीक चिरून घ्या. त्यानंतर एका बाऊलमध्ये दही घेऊन त्यात कांदा टाकून चांगलं फेटून घ्या. फेटून घेतलेल्या या मिश्रानात तुम्ही आपल्या चवीनुसार मीठ घेऊन मोहरीच्या डाळीची फोडणी देऊ शकता किंव्हा याचं पद्धतीने तुम्ही सोप्प्यात सोपी अशी कांदा आणि काकडीची कोशिंबीर बनवू शकता.
काकडी दह्याची कोशिंबीर कशी बनवाल?
बाऊलमध्ये कापलेली काकडी घेऊन त्यावर घट्ट दही घेऊन चांगले फेटुन घ्या नंतर त्यात मीठ मिक्स करून फेटा. यात तुम्ही आवश्यकतेनुसार डाळीची फोडणी देऊ शकता. तसेच अगदी कमीत कमी पदार्थ वापरून अगदी झटपट स्वरूपात ही काकडी कोशिंबीर तयार होते.
उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी आहार कसा असावा? पाहा तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला Video
यंदाच्या उन्हाळ्यांत दही आणि काकडीची पारंपरिक कोशिंबीर आपल्याला हायड्रेटड आणि थंडगार ठेवण्यास मदत करेल. ही कोशिंबीर सर्व्ह करतांना आपल्या आवडीनुसार त्यावर थोडीशी कोथिंबीर भुरभुरवून घालावी, अशी माहिती उमा पाटील यांनी दिलीये.