उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी आहार कसा असावा? पाहा तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला Video

Last Updated:

उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी मेंटेन ठेवण्यासाठी आपल्या शरीरानुरूप आहार घेणे हे प्रत्येक व्यक्तीच्या सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतं.

+
News18

News18

नारायण काळे, प्रतिनिधी 
जालना : उन्हाळा सुरू झाला की आपल्या शरीरामध्ये अनेक बदल होत असतात. या बदलानुरुप आपला आहार असणं अत्यंत गरजेचं असतं. वातावरणात वाढलेल्या तापमानामुळे आपलं शरीर लवकर डिहायड्रेट होण्यास सुरुवात होते. यामुळे आपल्याला थकवा देखील जाणवायला लागतो. उन्हाळ्यामध्ये पाण्याची पातळी मेंटेन ठेवण्यासाठी आपल्या शरीरानुरूप आहार घेणे हे प्रत्येक व्यक्तीच्या सुदृढ आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असतं. त्यामुळे उन्हाळ्यात आपला आहार कसा असावा? याबद्दलच जालन्यातील आहार तज्ज्ञ गीता कोल्हे यांनी माहिती सांगितली आहे.
advertisement
उष्णतेमुळे होतात हे विकार
उन्हामुळे सगळ्यांना थकवा जाणवायला लागतो शरीर कोरड पडायला लागतं. शरीरातील पाण्याची पातळी कमी होते अशा वेळेस तोंड येणे, हाता पायांची आग होणे, लघवीला जळजळ होणे अशा प्रकारचे विकार जाणवायला लागतात. या विकारांवर मात करण्यासाठी थंड गुणधर्म असणाऱ्या पदार्थांचा आपल्या आहारात समावेश करावा.
advertisement
या समर फूडचा करा आहारात समावेश
advertisement
धान्यापासून सुरुवात केल्यास उन्हाळ्यामध्ये नाचणी, ज्वारी तसेच गहू या धान्याचा आपल्या आहारात समावेश असावा. ज्वारी ही गुन्हाने थंड असते तसेच नाचणीमध्ये देखील अनेक पोषक तत्व असतात. नाचणी मुळे आपल्या शरीराला थंडावा मिळतो. नाचणीचे थालीपीठ करून आपण त्याचा आपल्या आहारात समावेश करू शकतो. नाचणी तसेच ज्वारीची आंबील देखील करता येते.
advertisement
सकाळी उठल्यानंतर सगळ्यात आधी नॉर्मल पाणी घ्यावे त्यामध्ये मध, लिंबू टाकून घेऊ शकता. यानंतर आठ ते नऊच्या दरम्यान सकाळचा नाश्ता हा व्हायलाच हवा. नाश्त्यामध्ये आपण मोड आलेली कडधान्य जसे की मटकी, मूग, हरभरा इत्यादींचा समावेश एक दिवसाआड करू शकतो. त्याचबरोबर सुक्या मेव्याचा समावेश देखील आपल्या नाश्त्यांमध्ये करावा. बरोबर हंगामी फळे आणि भरपूर पाणी पिण्याची काळजी घ्यायची आहे.
advertisement
नैराश्य, मानसिक तणाव दूर करायचा असेल तर हे फळ नक्की खा, खेळाडूंची आहे पहिली पसंत
दुपारच्या जेवणामध्ये भरपूर प्रमाणामध्ये सलाड घ्यायचे आहे. गाजर, काकडी, बीट इत्यादीचा समावेश करावा. याचबरोबर प्रामुख्याने ताकाचा आहारात समावेश करावा ताकाला अमृत म्हटलेलं आहे. ताकामध्ये वेगवेगळे पदार्थ टाकून आपण त्याचा मठ्ठा बनवून देखील घेऊ शकतो. शरीरातील उष्णता दाह कमी करण्यासाठी ताक हे अतिशय उत्तम आहे. यानंतर वरण, भात, पोळी भाजी असा आहार दुपारी घ्यायचा आहे. दुपारी जेवण केल्यानंतर दोन तास काहीही न खाता तसेच राहायचं आणि चार ते पाच वाजेच्या दरम्यान टरबूज खरबूज असे हंगामी फळे आपण खाऊ शकतो.
advertisement
किती...बारीक झालीस, सगळे हेच विचारतात? आता वजन वाढवूनच दाखवा, तेही महिन्याभरात!
संध्याकाळचे जेवण हे साधारणतः सात ते आठ वाजेच्या दरम्यान घ्यावे. संध्याकाळी शक्यतो हलका आहार घेण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये, भाजी भाकरी, खिचडी वरण-भात अशा प्रकारचा आहार ठेवावा. अशाप्रकारे दिनचर्या ठेवल्यास उन्हाळ्यामध्ये देखील आपण आपल्या शरीराला तंदुरुस्त ठेवू शकतो, असं गीता कोल्हे यांनी सांगितले.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हाळ्यात फिट राहण्यासाठी आहार कसा असावा? पाहा तज्ज्ञांचा महत्त्वाचा सल्ला Video
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement