उन्हामुळे शरीरात आलेला थकवा कमी करण्यासाठी होईल मदत; काय आहेत आईस ॲपलचे गुणकारी फायदे? Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
आईस ॲपल या नावाने ओळखले जाणारे हे फळ उन्हाळ्यातील एक उत्तम फळ आहे. या फळाच्या आत मध्ये शहाळ्याप्रमाणे गोड पाणी असते तर बाहेरून हे फळ जेलीप्रमाणे असते.
साईप्रसाद महेंद्रकर / प्रतिनिधी
कोल्हापूर : उन्हाळ्यात विविध फळांच्या माध्यमातून शरीरातील पाण्याचे प्रमाण हे नियंत्रित ठेवता येते. त्यातच कोल्हापुरात ताडगोळा हे फळ मिळू लागले आहे. आईस ॲपल या नावाने ओळखले जाणारे हे फळ उन्हाळ्यातील एक उत्तम फळ आहे. या फळाच्या आत मध्ये शहाळ्याप्रमाणे गोड पाणी असते तर बाहेरून हे फळ जेलीप्रमाणे असते. त्वचा विकारांसह अनेक आजारांवरही उपयुक्त ठरणारे हे फळ नेमके शरीराला कसे फायदेशीर ठरते, याबाबत कोल्हापूरच्या आहारतज्ज्ञ अमृता सूर्यवंशी यांनी माहिती दिली आहे.
advertisement
कोल्हापुरात सहसा ताडगोळा हे फळ मिळत नाही. मात्र यंदा ठिकठिकाणी हे ताडगोळे विक्रीसाठी आलेले पाहायला मिळत आहेत. या ताडगोळ्यामध्ये
अँटिबॅक्टेरियल, अँटीऑक्सिडंट आणि अँटी इन्फ्लेमेटरी गुणधर्म असतात. तर लोह, झिंक, फॉस्फोरस, विविध व्हिटॅमिन्स, कार्बोहायड्रेट्स, फायबर अशा घटकांनी युक्त असे हे फळ असल्याचे अमृता सूर्यवंशी सांगतात.
advertisement
पाम ट्री अर्थात ताडाच्या झाडाला जी फळे लागतात त्यांना ताडगोळे म्हंटले जाते. ताडगोळे किंवा आईस ॲपल फळाचे शरीराला खालील फायदे होतात.
1) या फळाच्या सेवनाने शरीरातील पाण्याची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत होते. उन्हामुळे शरीरात आलेला थकवा कमी करण्यासाठी हे फळ खूप उपयोगी आहे.
2) व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता असेल तर बऱ्याचवेळा पोटात गॅस तयार होणे, बद्धकोष्ठता अशा त्रासाला सामोरे जावे लागते. तर विविध पोषक घटक आणि भरपूर व्हिटॅमिन्स असल्यामुळे ताडगोळे हे फळ सेवन करणे उपयुक्त ठरते.
advertisement
3) उन्हाळ्यात लहान मुलांना कांजिण्या किंवा पुरळ उठणे यासारखे आजार होत असतात. अशावेळी शरीरावर उठलेल्या पुरळवर या फळांचा रस लावल्यास दाह कमी होऊन त्रास कमी होण्यास मदत होते.
4) या फळात लोह जास्त प्रमाणात असल्यामुळे एखाद्या व्यक्तीची हिमोग्लोबीन संदर्भातील समस्या किंवा शरीरातील थकव्या संदर्भातील त्रास दूर करण्यास उपयुक्त ठरते.
advertisement
5) अचानक वाढलेल्या अॅसिडिटीमुळे डोकेदुखीचा त्रास उद्भवू शकतो. अशावेळी सुद्धा हे फळ खाल्यास फायदा होतो.
याबरोबरच वजन कमी करण्यासाठी, उलटी रोखण्यासाठी अशा अजूनही काही समस्यांवर ताडगोळ्याची सेवन गुणकारी ठरते. त्यामुळे अशा शरीरासाठी उपयुक्त असणाऱ्या फळाचे नक्कीच नियमित सेवन करावे, असे देखील आहारतज्ज्ञ अमृता सूर्यवंशी यांनी सांगितले आहे.
Location :
Kolhapur,Kolhapur,Maharashtra
First Published :
March 19, 2024 8:36 AM IST
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/हेल्थ/
उन्हामुळे शरीरात आलेला थकवा कमी करण्यासाठी होईल मदत; काय आहेत आईस ॲपलचे गुणकारी फायदे? Video