मासिक पाळीचा त्रास कमी करण्यासाठी कॉफी पिताय? दुष्परिणाम बघा Video
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कॉफी हे तुमच्यासाठी योग्य पेय असू शकते. पण तुम्ही तुमच्या मासिक पाळी दरम्यान कॉफीचे सेवन करत असाल तर कॅफीन प्यायल्याने तुमच्या मासिक पाळीवर काय परिणाम होऊ शकतो? पाहा
लतिका तेजाळे
मुंबई: अनेक महिलांना सकाळची फ्रेश सुरुवात करण्यासाठी किंवा रात्री उशिरापर्यंत जागे राहण्यासाठी गरम गरम कॉफी पिण्याची सवय असते. काहींना ते काम करत असताना, अभ्यास करताना किंवा काहीही करत असताना सतत कॉफी पिण्याची गरज भासू शकते. यासाठी नक्कीच कॉफी हे तुमच्यासाठी योग्य पेय असू शकते. पण तुम्ही तुमच्या मासिक पाळीदरम्यान कॉफीचे सेवन करत असाल तर कॅफीन प्यायल्याने तुमच्या मासिक पाळीवर काय परिणाम होऊ शकतो? याचीच माहिती मुंबईतील आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी दिलीय.
advertisement
काय होतो परिणाम?
कॉफीमध्ये कॅफेन हे कमी प्रमाणात असते. पण त्याच्या तुलनेत सॉफ्टड्रींक किंवा कोल्डड्रिंकमध्ये कॅफेनचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. या कॅफेनमुळे शरीरातील पाणी पातळी कमी होते आणि परिणामी डिहायड्रेशन होते. शरीरात कॅफेनचे प्रमाण अधिक वाढल्यामुळे डिहायड्रेशन तर होतेच पण पेटके देखील येण्यास सुरुवात होते. मासिक पाळी दरम्यान महिलांना पहिले 2 दिवस पोट दुखणे, कंबर दुखणे, पेटके येणे ह्या समस्या होत असतात. पण कॅफेन जास्त घेतल्यास या सर्व समस्यांसोबत डिहायड्रेशला देखील तोंड द्यावे लागते.
advertisement
अवयवदानातून लिव्हर ट्रान्सप्लांट; वर्ध्यात प्रथमच पार पडली अनोखी शस्त्रक्रिया
महिलांनी मासिक पाळी दरम्यान कॉफी, चहा किंवा कोल्डड्रिंक इत्यादी कॅफेन युक्त प्येय टाळावे. त्या व्यतिरिक्त 5 दिवस आपले डाएट व्यवस्थित फॉलो करावे. आपल्या आहारात फळे, पाले भाजी इत्यादींचा समावेश करावा, अशी माहिती आहारतज्ज्ञ आरती भगत यांनी दिली आहे.
Location :
Jalna,Jalna,Maharashtra
First Published :
March 18, 2024 1:45 PM IST