अवयवदानातून लिव्हर ट्रान्सप्लांट; वर्ध्यात प्रथमच पार पडली अनोखी शस्त्रक्रिया
- Published by:News18 Marathi
Last Updated:
कॅडेव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांटची या रुग्णालयातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असून विदर्भात नागपूरबाहेर झालेली ही पहिली शस्त्रक्रिया होय.
वर्ध्यातील सावंगी मेघे येथील आचार्य विनोबा भावे ग्रामीण रूग्णालयात प्रथमच एका गरजू रुग्णावर लिव्हर म्हणजे यकृत प्रत्यारोपण करण्यात आले. यापूर्वी ब्रेन डेड झालेल्या मरणावस्थेतील रुग्णांद्वारे प्राप्त झालेल्या अवयवदानातून 16 किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया सावंगी रुग्णालयात झाल्या आहेत. मात्र, कॅडेव्हरिक लिव्हर ट्रान्सप्लांटची या रुग्णालयातील ही पहिलीच शस्त्रक्रिया असून विदर्भात नागपूरबाहेर झालेली ही पहिली शस्त्रक्रिया होय.
advertisement
नागपूर येथील व्यवसायाने इलेक्ट्रिशियन असलेला राकेश सोनटक्के (24 वर्षे) हा तरूण उंचावरून पडल्याने गंभीर जखमी झाला. या अपघातग्रस्त तरुणाला लगेच नजीकच्या दवाखान्यात नेण्यात आले. मात्र त्याची अवस्था बघता नातेवाईकांनी नागपूरच्या एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत वैद्यकीय उपचारांसाठी भरती केले. या रुग्णालयात त्याच्यावर तातडीने शस्त्रक्रिया करण्यात आली.
advertisement
मात्र, रुग्णाचा मेंदू पूर्णपणे मृत झाल्याने वैद्यकीय उपचारांना कोणताही प्रतिसाद मिळणार नसल्याचे स्पष्ट झाले. दिनांक 11 मार्च रोजी एम्स येथील डाॅक्टरांनी नातेवाईकांना तशी कल्पना दिली. त्यासोबतच राकेशच्या अवयवदानामुळे अन्य गरजू रुग्णांना नवजीवन मिळू शकते, याचीही जाणीव कुटुंबातील सदस्यांना करून देण्यात आली अखेर नातलगांनी पुढाकार घेत अवयवदानास संमती दिली.
advertisement
advertisement
advertisement
लिव्हर प्रत्यारोपण शस्त्रक्रिया मुंबईचे डाॅ. रवी मोहनका, डाॅ. प्रशांत राव, डाॅ. विनायक निकम, बधिरीकरण तज्ज्ञ डाॅ. अमेया पंचवाघ, डाॅ. सौरभ कामत, डाॅ. माधवी नायक यांनी पार पाडली. तर किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रियेत डॉ. संजय कोलते, डाॅ. अभिजित ढाले, डाॅ. कपिल सेजपाल, डाॅ. ॠतुराज पेडणेकर यांचा सहभाग होता.