ब्रेड रोल्स साहित्य
ब्रेड स्लाइस – 5-6
उकडलेले बटाटे – 2
चिरलेला कांदा – 1
हिरव्या मिरच्या – 2
कोथिंबीर – 2 टेबलस्पून
मसाले – मीठ, मिरपूड, हळद, गरम मसाला
तेल – तळण्यासाठी
पुरणपोळीचा कंटाळा आलाय? झटपट तयार करा सोजीची गोड पोळी, पाहा रेसिपी Video
पाककृती:
उकडलेले बटाटे मॅश करून त्यात कांदा, मिरची, कोथिंबीर आणि मसाले मिसळा. ब्रेड स्लाइसच्या कडा कापून थोडं पाणी लावून मऊ करा. ब्रेड स्लाइसमध्ये हे मिश्रण ठेवून रोल बनवा आणि कडा नीट बंद करा. ब्रेड स्लाइसचे कापलेले कडे मिक्सर मध्ये वाटून घ्या आणि रोलला त्याचे कोटिंग करा जेणेकरून ते कुरकुरीत लागतील. कढईत तेल तापवून हे रोल्स सोनेरी आणि कुरकुरीत होईपर्यंत तळा.
advertisement
टिप: हे रोल्स टोमॅटो सॉस किंवा हिरव्या चटणीसोबत गरमागरम सर्व्ह करा.
कमी वेळेत चविष्ट आणि कुरकुरीत नाश्ता हवा असल्यास ब्रेड रोल्स हा पर्याय उत्तम आहे. नक्की करून पाहा.





