अमरावती : अनेक वेळा सायंकाळच्या नाश्त्याला पराठा बनवला जातो. पराठ्यासोबत नेहमी टोमॅटो सॉस किंवा इतर नेहमीच्या चटणी खाऊन बोर झाला असाल तर चटकदार अशी लसूण चटणी तुम्ही पराठ्यासोबत खाण्यासाठी बनवू शकता. आमसूल, साखर आणि इतर साहित्य वापरून बनवलेली ही चटणी अतिशय टेस्टी लागते. चटपटीत अशा लसूण चटणीची रेसिपी अमरावतीमधील रसिका शेळके यांनी सांगितली आहे.
advertisement
लसूण चटणी साहित्य
लसूण पाकळ्या, कोथिंबीर, लाल तिखट, मीठ, आमचूर पावडर, धने पावडर, मसाला, जिरे, तेल हे साहित्य लागेल.
लसूण चटणी बनवण्यासाठी कृती
सर्वात आधी लसूण खलबत्त्यामध्ये बारीक करून घ्यायचा आहे. तुम्ही मिक्सर मधून पण बारीक करू शकता. पण, खलबत्त्यामध्ये बारीक केल्यास त्याची चव छान लागते. लसूण बारीक करून घेतल्यानंतर त्यात लाल तिखट, चपाटा, धने पावडर, मसाला, आमचूर पावडर, मीठ हे सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. लाल तिखट चपाटा घेतल्यास चटणीला छान कलर येतो. हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे.
विदर्भ स्पेशल सांबार वडी, खायला टेस्टी आणि चटकदारही, नाश्त्याला बनवा घरीच, Videoत्यानंतर चटणीला तडका द्यायचा आहे. त्यासाठी भांड्यामध्ये तेल टाकायचं. तेल थोडं गरम झालं की जिरे टाकायचं. जिरे तडतडले की त्यात लसूणचे मिश्रण टाकून ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर 5 ते 10 मिनिटे मंद आचेवर चटणी छान तेल सोडतपर्यंत शिजवून घ्यायची आहे. 5 ते 10 मिनिटानंतर चटणी तयार होईल. तेल सोडलं आणि कलर आला की समजायचं चटणी तयार झाली आहे.
त्यानंतर कोथिंबीर टाकून गॅस बंद करून घ्यायचा. लसूण चटणी तयार झाली असेल. ही चटणी तुम्ही कोणत्याही पराठ्यासोबत खाऊ शकता. त्याचबरोबर एखाद्या वेळी भाजी ऐवजी या चटणीसोबत सुद्धा तुम्ही जेवण करू शकता. आमचूर पावडर न वापरता तुम्ही लिंबाचा रस सुद्धा वापरू शकता. कमीत कमी वेळात अतिशय टेस्टी अशी लसूण चटणी तयार होईल, असे रसिका शेळके यांनी सांगितले.