ग्रीन आईस टी लागणारे साहित्य
पाणी, कोणत्याही फ्लेवरची ग्रीन टी तुम्ही घेऊ शकता, संत्री ( यामध्ये तुम्ही मोसंबी किंवा लिंबाचा देखील वापर करू शकता.) पुदिन्याची पाने, सब्जा बी, साखर आणि आईस हे एवढं साहित्य यासाठी लागेल.
Smoothie Recipe : उन्हाळ्यात एकदम रहाल फ्रेश, शरिराला थंडावा देणारी स्मूदी बनवा घरी, रेसिपी पाहा
advertisement
ग्रीन आईस टी बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम एका भांड्यात पाणी घ्यायचं. ते पाणी चांगल्या प्रकारे उकळून घ्यायचं. त्यानंतर गॅस बंद करून त्यामध्ये ग्रीन टी बॅक आहेत त्या या गरम पाण्यात टाकायच्या. पण गॅस बंद केल्यानंतरच तुम्ही त्यामध्ये ग्रीन टी टाकावं. त्यामुळे चांगला फ्लेवर यायला मदत होते. नंतर ते मिश्रण तसेच तुम्ही पंधरा ते वीस मिनिटं थंड होण्यासाठी ठेवून द्यायचं. कारण त्यामध्ये सर्व ग्रीन टीचे फ्लेवरचे उतरतात. ते मिश्रण तुम्ही फ्रीजमध्ये देखील थंड व्हायला ठेवू शकता.
सर्विंगसाठी एका ग्लासमध्ये संत्र्याच्या फोडी हाताने क्रश करून सालीसकट टाकायच्या. त्यानंतर त्यामध्ये फ्रेश पुदिन्याची पाने टाकायचे आणि चमच्याने हे सर्व मिश्रण क्रश करून घ्यायचं. त्यानंतर त्यामध्ये भरपूर असा बर्फ टाकायचा. आणि वरतून सब्जा बी टाकायची. सब्जा बी टाकल्यानंतर जे ग्रीन टीचे मिक्सर आहे ते ग्लासमध्ये टाकायचं ते चांगलं एकजीव करून घ्यायचं. जर तुम्हाला गोड हवं असेल तर त्यामध्ये तुम्ही तुमच्या चवीनुसार साखर देखील टाकू शकता. वरतून गार्निशिंगसाठी तुम्ही संत्र्याची एक फोड आणि पुदिन्याची पाने टाकून शक्यता. अशा पद्धतीने झटपट असा ग्रीन आईस टी हा तयार होते. तर हा तुम्ही घरी एकदा नक्की ट्राय करा.