मुंबई : वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ खायला सर्वांनाच आवडतात. आपण दुकानात गेलो की फरसाण, चकली, शेव, जलेबी, फाफडा हे पदार्थ चवीनुसार आवडीने घेऊन खातोच. पण त्यातीलच एक प्रकार म्हणजे खांडवी हा गुजराती खाद्यपदार्थ अनेकांना खूप आवडतो. खांडवीचे नाव ऐकताच तोंडाला पाणी येते. गुजराती खाद्यपदार्थ चवीने परिपूर्ण आहेत आणि खांडवी देखील लोकप्रिय खाद्यपदार्थ आहे. त्यामुळे अगदी सोप्प्या पद्धतीने खांडवी रेसिपी परफेक्ट घरी कशी बनवता येईल याबद्दलच मुंबईतील गृहीणी माधुरी अंबुरे यांनी माहिती दिली आहे.
advertisement
खांडवी बनवण्यासाठी साहित्य
1 वाटी बेसन पीठ, 3 वाटी ताक, 1 वाटी दही, 5-6 हिरव्या मिरच्या, सुखे खोबरे, आल, लसूण, कोथिंबीर, कडीपत्ता, हिंग, मीठ, मोहरी, जिरे, हळद, तेल साहित्य लागेल.
आता चपाती बनवायचं नो टेन्शन, कोल्हापुरातील तरुणाने शोधला उत्तम उपाय, अनेकांना होणार फायदा
खांडवी बनवण्याची कृती
प्रथम बेसन पीठ, ताक, दही बनविण्याच्या मोजणीनुसार वाटीमध्ये काढून घ्या. नंतर मिरची, लसूण यांचा ठेचा बनवून घ्या. मग हे सर्व मिश्रण नीट मिक्स म्हणजेच गुठळ्या होणार नाहीत असे मिश्रण करून घ्या. मंद आचेवर मिश्रण घट्ट होईपर्यंत ढवळून घ्यावे. घट्ट झाल्यावर ताटाच्या मागच्या बाजूला तेल लावून वरील मिश्रण पातळ पसरवून घेऊन नंतर 2 इंचाच्या पट्टया कापून घ्याव्या.
शेवग्याच्या शेंगांचं आरोग्यदायी सूप, डॉक्टरही देतात पिण्याचा सल्ला, लगेच नोट करा रेसिपी
त्याचे रोल बनवून घेणे. नंतर मोहरी-जिरे कडीपत्ताची फोडणी करून त्या वर घालून, खोबऱ्याचा किस, कोथिंबीर घालावी. या पद्धतीने चमचमीत, खमंग खांडवी तयार होते. हा पदार्थ भूकेच्या वेळी झटपट बनवून खाऊ शकतो.