हरभऱ्याची भाजी बनवण्यासाठी साहित्य
कोवळी तोडून घेतलेली हरभऱ्याची पाने, वाफवलेले तुरीचे दाणे, शेंगदाण्याचा कूट, हळद, तिखट, मीठ, जिरे, बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची, चिरलेला टोमॅटो आणि चिरलेला कांदा हे साहित्य लागणार आहे.
पालकापासून घरीच बनवा कुरकुरीत आणि चविष्ट चकली; वाचा परफेक्ट रेसिपी
हरभऱ्याच्या पानांची भाजी बनवण्यासाठी कृती
advertisement
सर्वप्रथम कढईमध्ये थोडसं तेल घेऊन त्यात जिरे आणि लसूण अॅड करायचा आहे. त्यानंतर बारीक चिरलेली हिरवी मिरची चांगली परतून घ्यायची आहे. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा घालून परतून घ्यायचं आहे. आता आपल्याकडे असलेले मसाले म्हणजेच हळद, तिखट, मीठ आणि शेंगदाण्याचा कूट अॅड करायचा आहे. चांगलं परतून झाल्यानंतर चिरलेला टोमॅटो आणि वाफवलेले तुरीचे दाणे ॲड करून पुन्हा चांगलं परतून घ्यायचा आहे.
आता हरभऱ्याची कोवळी तोडलेली पाने अॅड करून मस्तपैकी परतून घेऊन वाफ येण्यासाठी झाकून ठेवायची आहे.( ही पाने शेतातून तोडून आणल्यानंतर धुतली जात नाही असं म्हणतात की ही भाजी धुतली की त्याचे विटामिन्स आणि त्यातली थोडीशी खारट चव ही चालली जाते. त्यामुळे विशेष चव राहत नाही त्यामुळे ती धुतली जात नाही आहे तशीच तिला शिजवली जाते) एक वाफ काढून घेतल्यानंतर ही भाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही सर्व करून लगेच गरमागरम ही भाजी पोळी सोबत किंवा भाकरी सोबत खाऊ शकता,असं हिना राऊत सांगतात.
ओल्या मटारची भजी कधी खाल्लेत का? घरीच बनवा सोपी रेसिपी Video
कोवळी तोडून आणलेली हरभऱ्याची पाने, वाफवलेले तुरीचे दाणे, शेंगदाण्याचा कूट, हळद, तिखट, मीठ, जिरे बारीक चिरलेला लसूण, बारीक चिरलेली हिरवी मिरची चिरलेला टोमॅटो आणि चिरलेला कांदा हे साहित्य घेऊन अगदी सोप्या पद्धतीने हरभऱ्याच्या कोवळ्या पानांची भाजी तुम्ही देखील एकदा तरी नक्की ट्राय करून बघा.