होममेड चॉकलेट बनवण्यासाठी साहित्य?
होममेड चॉकलेट तयार करण्यासाठी सर्वप्रथम 50 ग्रॅम डार्क कंपाऊंड घ्यायचे. त्याचबरोबर 50 ग्राम चॉकलेट घ्यायचे. तुम्ही फिफ्टी-फिफ्टी दोन्ही घेऊ शकता. त्यानंतर हे चॉकलेट छान बारीक चॉप करून घ्यायचे. आणि त्यांना मेल्ट करून घ्यायचं. तुम्ही त्यासाठी डबल बॉयलर मेथड पद्धत सुद्धा वापर करू शकता. चॉकलेट मेल्ट झाल्यानंतर त्याला मिक्स करून घ्यायचं. चॉकलेट एकदा मेल्ट झाल्यानंतर तुम्ही तुमच्या आवडीनुसार चॉकलेट तयार करू शकता.
advertisement
नाचणीच्या पिठापासून बनवा आरोग्यदायी मंचाऊ; एकदा खाल तर परत बनवाल
ड्रायफ्रूट चॉकलेट कसं तयार करायचं?
तुम्ही तुमच्या आवडीनुसार सर्व ड्रायफ्रूट घेऊ शकता. त्याचे बारीक चॉप करून घ्यायचे. चॉप केलेले ड्रायफ्रूट हे चॉकलेटमध्ये मिक्स करून त्यानंतर चॉकलेटचा मोल्डममध्ये टाकून त्याला 5 ते 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं.
क्रिस्पी राईस कॉल टू चॉकलेट
आपण जे चॉकलेट मेल्ट केलेला आहे त्या चॉकलेटमध्ये तुम्ही क्रिस्पी राईस बॉल टाकून ते मिश्रण मिक्स करून घ्यायचं. सेम चॉकलेट मोल्डममध्ये टाकून त्याला सुद्धा 5 ते 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून द्यायचं.
ख्रिसमससाठी बनवा स्पेशल डिश, रब चॉकलेट बॉल एकदा ट्राय तर करा
बटरस्कॉच चॉकलेट
जी चॉकलेट आपण मेल्ट केलेली आहे त्याच चॉकलेटमध्ये बटरस्कॉचचे नट्स भेटतात किंवा तुम्ही घरी सुद्धा बटरस्कॉच तयार करू शकता. तयार केलेले बटरस्कॉच छान क्रश करून चॉकलेटमध्ये मिक्स करून मोल्डमध्ये टाकायचे. सेट होण्यासाठी 5 ते 10 मिनिटांसाठी फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं.
तुटी फुटी चॉकलेट
तुटी फुटी चॉकलेट तयार करण्यासाठी सगळ्यात पहिले व्हाईट कंपाऊंड चॉकलेट हे मेल्ट करून घ्यायचं. डबल बॉयलर मेथडने मेल्ट झालेले हे चॉकलेटमध्ये मिक्स करून मोल्डममध्ये टाकून ते सुद्धा फ्रीजमध्ये सेट होण्याकरिता ठेवून द्यायचं.
विदर्भातील झणझणीत कोष्टी डाळ-कांदा घरगुती पद्धतीनं कशी बनवाल? रेसीपी पाहाच एकदा
ओरिओ बिस्कीटचे चॉकलेट
ओरिओ बिस्कीटचे चॉकलेट तयार करण्यासाठी आपण जे व्हाईट चॉकलेट मेल्ट केलेला आहे. त्या चॉकलेटमध्ये ओरिओ बिस्कीट हाताने क्रश करून टाकून द्यायचं. त्यानंतर डार्क कंपाऊंड जे आपण मेल्ट केलेला आहे. सर्वप्रथम मोल्डमध्ये एक लेयर डार्क कंपाऊंड चॉकलेट टाकायची. त्यानंतर ओरिओचं मिश्रण त्याच्यात टाकायचं आणि वरतून परत एकदा त्यामध्ये डार्क कंपाऊंड टाकायचं आणि सेट होण्याकरिता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं अगदी तुम्ही 5 ते 10 मिनिटांमध्ये हे सर्व चॉकलेट घरच्या घरी तयार करू शकता, असं श्रुती क्षीरसागर यांनी सांगितलं.