छत्रपती संभाजीनगर : आता लवकरच महाशिवरात्र येणार आहे. महाशिवरात्र म्हटलं तर आपल्यापैकी अनेकांना उपवास असतो. पण उपवासाच्या दिवशी आपण सर्वजण शाबुदाणा खिचडी, वडे किंवा भगर एवढंच खातो. पण या महाशिवरात्रीला जर तुम्हाला वेगळं काही खायचं असेल आणि ते सुद्धा युनिक तर तुम्ही घरी झटपट असा उपवासाचा पिझ्झा करू शकता. अगदी सोपी आणि झटपट बनणारी ही रेसिपी आहे. याची रेसिपी आपल्याला प्रज्ञा तल्हार यांनी सांगितली आहे.
advertisement
पिझ्झासाठी लागणारे साहित्य
उभे चिरलेले बटाट्याचे काप, लाल तिखट, तूप, काळे द्राक्षे, इनो, भगर आणि साबुदाण्याचे पीठ, चीज, बटाट्याचा खिस, चिली फ्लेक्स, पनीर, हिरवी मिरची ( तिखट नसलेली मिरची ) सेंधव मीठ हे साहित्य लागेल.
पिझ्झा तयार करण्याची कृती
सर्वप्रथम तव्यावरती बटाट्याचे काप टाकायचे. ते दहा ते बारा मिनिटात चांगले फ्राय करून घ्यायचे. त्यानंतर आपल्या गरजेनुसार पीठ घ्यायचं. ते पाणी आणि थोडसं मीठ टाकून फेटून घ्यायचं. जास्त पातळ पण नाही आणि जास्त घट्ट पण नाही ते पीठ त्या बटाट्याच्या कापावर टाकायचं आणि दहा मिनिटे तसेच ठेवून द्यायचं. सॉस तयार करण्यासाठी पॅनमध्ये टाकून थोडं तूप टाकायचं. त्यानंतर त्यामध्ये तिखट टाकायचं आणि बटाट्याचा खिस आणि चीज हे पाणी टाकून पातळ करून घ्यायचं. ते त्या कढईत टाकायचं आणि त्याला चांगलं शिजू द्यायचं. त्यामध्ये थोडंसं मीठ देखील टाकायचं त्यानंतर शिजू द्यायचे. हिरवी मिरची आणि पनीर हे थोडसं फ्राय करून घ्यायचं.
नंतर बटाट्याचे काप आणि पीठ टाकलेला बेस आहे तो उलटा करून घ्यायचा म्हणजे पलटून घ्यायचा. त्यानंतर त्यावरती आपण जो सॉस केलेला आहे तो टाकायचा आहे आणि वरतीनंतर टॉपिंगसाठी पनीर आणि हिरवी मिरची टाकायची. काळ्या द्राक्षांचे काप टाकायचे आणि त्यावरती चीज टाकायचं. चीज मेल्ट झालं की एका डिशमध्ये तो पिझ्झा काढून घ्यायचा. अशा पद्धतीने हा पिझ्झा तयार होतो.