कढीपत्ता चटणी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 मोठी वाटी कढीपत्ता, 2 छोटे चमचे उडीद डाळ आणि चना डाळ, 1 छोटा चमचा खोबरे किस, आमचूर पावडर, लाल तिखट, मीठ, 6 ते 7 लसूण पाकळ्या, तेल आणि जिरे हे साहित्य लागेल.
Success Story: आई-मुलाची जोडी गाजवत आहे पुरणपोळीचा व्यवसाय, महाराष्ट्राची चव पोहोचतेय परदेशात! Video
advertisement
कढीपत्ता चटणी बनवण्याची कृती
सर्वात आधी चना डाळ थोडे तेल टाकून भाजून घ्यायची आहे. नंतर त्याच तेलात उडीद डाळसुद्धा भाजून घ्यायची आहे. त्यानंतर कढीपत्तासुद्धा भाजून घ्यायचा आहे. हे सर्व भाजून घेतल्यानंतर कढीपत्ता आणि डाळ मिक्सरमधून बारीक करून घ्यायची आहे. त्यानंतर त्यात जिरे, मीठ, लाल तिखट, आमचूर पावडर, खोबरे किस, लसूण पाकळ्या टाकून तेसुद्धा व्यवस्थित बारीक करून घ्यायचं आहे.
बारीक केल्यानंतर ती चटणी चमच्याने मिक्स करून घ्यायची आहे. आरोग्यवर्धक अशी कडीपत्ता चटणी तयार होईल. ही चटणी तुम्ही दररोजच्या जेवणात थोडे तेल टाकून खाऊ शकता. चवीला अगदी छान आणि आरोग्यासाठीही उत्तम असणारी ही चटणी कमीत कमी वेळात तयार होते. यामध्ये लागत असल्यास तुम्ही शेंगदाणे सुद्धा टाकून घेऊ शकता. त्याचबरोबर थोडी साखरही तुम्हाला हवी असल्यास तुम्ही टाकू शकता.