वर्धा : आंब्याचा सिजन सुरु झालेला आहे. बाजारात सगळीकडे आंबे, कैरी आणि त्याचे विविध प्रकार दिसू लागले आहेत. कैरी आणि आंब्याचे विविध पदार्थ बनवून आवडीने खाल्ले जातात. उन्हाळ्यात दही ताकाची कढी घरोघरी बनवली जाते मात्र कैरीची आंबट गोड कढी देखील चवीला अप्रतिम लागते. याचीच रेसिपी वर्धा येथील गृहिणी अनुजा देशपांडे यांनी सांगितली आहे.
advertisement
कैरीची आंबट गोड कढी बनवण्यासाठी साहित्य
4 उकडलेली कैरी, 1 वाटी गुळ, 2 टिस्पून बेसन, 2-3 हिरव्या मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, आलं लसूण पेस्ट, कढीपत्ता, कोथिंबीर, जिरे, मोहोरी, मेथी दाणे, तिखट, हळद, मीठ, हिंग हे साहित्य लागेल.
कडधान्य खाण्याचा कंटाळा येतोय? मग सोप्या पद्धतीनं बनवा कडधान्याचे थालीपीठ, रेसिपी पाहाच Video
कैरीची आंबट गोड कढी बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम कैरी कुकरमध्ये उकडून घ्या. थंड झाल्यावर कैरीतील सर्व गर बाहेर काढून घ्या आणि त्यात थोडं पाणी आणि 2 टिस्पून बेसन अॅड करून रवीच्या साह्याने एकत्र करून घ्या. त्यात गुठळ्या राहता कामा नये. आता एका गंजीत तेल घालून त्यात जिरं मोहोरी, लसूण, हिरवी मिरची, कढीपत्ता, आलं लसूण पेस्ट, तिखट, हळद, मीठ, मेथी दाणे, हिंग अॅड करून छान एकत्र करून घ्या. त्यात कैरीचा गर आणि बेसन मिक्स केलेलं मिश्रण अॅड करून घ्या. आता हवं तेवढं पाणी अॅड करा. आता गुळ घालून चांगलं एकत्र करून घ्या. उकळी आल्यावर कोथिंबीर घालून गरमागरम कैरीची आंबट गोड कढी खाण्यासाठी तयार आहे.