कैरीच लोणच बनवण्यासाठी लागणारे साहित्य:- बारीक काप केलेली कैरी, तेल, साखर, हळद, जिरे, मोहरी आणि लाल तिखट हे साहित्य लागेल.
उन्हाळ्यात शरीर होईल थंड कूल, तयार करा झटपट असे सरबत, रेसिपी लगेच पाहा
कैरीचे लोणचे बनवण्याची कृती:- सर्वात आधी बारीक काप केलेली कैरी एका भांड्यात काढून घ्यायची आहे. त्यांनतर त्यात मीठ टाकून घ्यायचं आहे. मीठ त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. आता त्यात लाल तिखट टाकायचं आहे. तिखट हे तुमच्या अंदाजानुसार टाकायचं आहे. तिखट सुद्धा कैरीत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
advertisement
तिखट आणि मीठ व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर यात हळद टाकून घ्यायची आहे. लोणच्याला कलर येण्यासाठी आपण हळद टाकून घ्यायची आहे. त्यांनतर आणखी मिक्स करून घाय्याच आहे. तिखट हळद आणि मीठ व्यवस्थित मिक्स केल्यानंतर कैरीचा छान रंग आलेला असेल. त्यानंतर एका वाटीमध्ये तेल गरम करून घ्यायचं. तेल गरम झालं की जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. जिरे आणि मोहरी तेलात छान तळतळली की ते तेल कैरित टाकून घ्यायचं आहे. त्यानंतर ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. त्यानंतर त्यात साखर टाकून घ्यायची. साखर तुमच्या अंदाजानुसार टाकायची आहे. साखर सुद्धा यात मिक्स करून घ्यायची.
आता हे सर्व मिक्स झाल्यानंतर लोणचे 1 ते 2 तास बाजूला झाकून ठेवायचे आहे. त्यातील साखर मुरत आली की लोणचे खाण्यासाठी टेस्टी लागते. आता 2 तासानंतर लोणच तयार झालेलं असेल. दररोजच्या जेवणासोबत तुम्ही हे झटपट तयार होणार चटपटीत लोणच खाऊ शकता.