TRENDING:

उन्हाळ्यात वाढेल जेवणाची चव, घरीच बनवा आंबट-गोड अशी कैरीची लुंजी, रेसिपीचा Video

Last Updated:

उन्हाळ्यात जेवणासोबत चवीसाठी तुम्ही आंबट गोड अशी कैरीची लुंजी बनवू शकता. कमीत कमी वेळात टेस्टी असा पदार्थ तयार होते. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरूपी, प्रतिनिधी 
advertisement

अमरावती : उन्हाळ्यात कैरीपासून अनेक पदार्थ बनवले जातात. त्यापैकी एक म्हणजे कैरीची लुंजी. हा पदार्थ उन्हाळ्याच्या दिवसांत जेवणासोबत चवीसाठी बनवतात. उन्हाळ्याच्या सुरुवातीला लोणचे बनवता येत नाही. त्यामुळे जेवणात काहीतरी आंबट गोड असायला हवं म्हणून गृहिणी हा पदार्थ बनवतात. त्याचबरोबर लग्नसराईमध्ये सुद्धा बनवला जातो. कैरीची तडका देऊन त्यात साखर किंवा गूळ टाकून हा आंबट गोड पदार्थ बनवला जातो. कमीत कमी वेळात कैरीची लुंजी कशी बनवायची? याची रेसिपी अमरावतीमधील वृषाली भुजाडे यांनी सांगितली आहे.

advertisement

कैरीची लुंजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य

स्वच्छ धुवून घेतलेली आणि बारीक काप करून घेतलेली कैरी, तेल, मोहरी, जिरे, कडीपत्ता, लाल तिखट, हळद, मीठ आणि साखर हे साहित्य लागेल.

Perfect Chapati Recipe: चपात्या होतील मऊसूत, 2 घास जास्त जातील, वापरून तर बघा 'या' टिप्स!

कैरीची लुंजी बनवण्याची कृती

सर्वात आधी भांड्यात तेल टाकून घ्यायचे. तेल गरम झाले की त्यात जिरे आणि मोहरी टाकून घ्यायची. त्यानंतर कडीपत्ता टाकायचा आहे. त्यानंतर लगेच हळद, मीठ आणि लाल तिखट टाकून घ्यायचे आणि परतवून घ्यायचे. त्यानंतर कैरी टाकून घेऊन ती सुद्धा परतवून घ्यायची आहे. त्यानंतर 5 मिनिटे झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे.

advertisement

5 मिनिटानंतर त्यात साखर टाकून घ्यायची. साखर टाकून मिक्स न करता ती वरून टाकून घ्यायची आणि आणखी 5 मिनिटे झाकण ठेवून आणखी शिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर साखरेला पाणी सुटलेलं असेल. तेव्हा संपूर्ण साहित्य मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर आणखी 10 ते 15 मिनिटे व्यवस्थित कैरीची लुंजी शिजवून घ्यायची आहे.

advertisement

15 मिनिटानंतर कैरीची लुंजी तयार झाली असेल. तुम्ही ही कैरीची लुंजी 5 ते 6 दिवस स्टोअर करून ठेऊ शकता. दररोजच्या जेवणात चवीसाठी वापरू शकता. त्याचबरोबर साखरेएवजी तुम्ही गूळ सुद्धा वापरू शकता. तुम्ही नक्की बनवून बघा, कैरीची आंबट गोड अशी लुंजी.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
उन्हाळ्यात वाढेल जेवणाची चव, घरीच बनवा आंबट-गोड अशी कैरीची लुंजी, रेसिपीचा Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल