TRENDING:

उन्हाळ्यात शरीराला आरोग्यदायी, घरीच बनवा चमचमीत काकडीची तंबळी, रेसिपीचा संपूर्ण Video

Last Updated:

दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीत मानाचे स्थान असलेला हा पदार्थ कोकणातही तितक्याच आवडीने तयार केला जातो. काकडीचा हलका गारवा, नारळाची मऊसर चव आणि खास फोडणीचा सुगंध यामुळे तंबळी ही केवळ चविष्टच नव्हे तर पचनासाठी ही उपयुक्त ठरते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : उन्हाळ्याच्या दिवसांत शरीराला थंडावा देणाऱ्या पारंपरिक पदार्थांची मागणी वाढत असताना काकडीची तंबळी पुन्हा एकदा घराघरांत लोकप्रिय ठरत आहे. दक्षिण भारतीय खाद्यसंस्कृतीत मानाचे स्थान असलेला हा पदार्थ कोकणातही तितक्याच आवडीने तयार केला जातो. काकडीचा हलका गारवा, नारळाची मऊसर चव आणि खास फोडणीचा सुगंध यामुळे तंबळी ही केवळ चविष्टच नव्हे तर पचनासाठी ही उपयुक्त ठरते.
advertisement

कमी साहित्य आणि सोपी पद्धत यामुळे हा पदार्थ सहज तयार करता येतो, त्यामुळेच व्यस्त दिनचर्येतही अनेक जण त्याचा आस्वाद घेत आहेत. गरम भातासोबत दिली जाणारी काकडीची तंबळी सध्या उन्हाळ्यासाठी एक परफेक्ट, पारंपरिक आणि आरोग्यदायी पर्याय म्हणून पुढे येत आहे.

काकडीची तंबळी साहित्य 

1 मध्यम आकाराची काकडी (सालीसकट, बारीक चिरलेली/किसलेली)

advertisement

½ कप किसलेले नारळ

½ चमचा जिरे

अर्धी वाटी दही

मीठ चवीनुसार

साखर चवीनुसार

मिरे

लसूण 4-5 पाकळ्या

आले थोडेसे

कोथिंबीर

फोडणीसाठी :

1 चमचा तेल

½ चमचा मोहरी

1–2 सुकी लाल मिरच्या

थोडीशी कढीपत्ता पाने

जिरे

काकडीची तंबळी कृती 

काकडी बारीक चिरून किंवा किसून घ्या त्यात कोथिंबीर, खोबरे, मिरे, लसूण, आले आणि मीठ एकत्र करून थोडेसे पाणी घालून जाडसर पेस्ट करा. ही पेस्ट चटणीसारखी, पण थोडी घट्ट असावी. या पेस्टमध्ये अर्धी वाटी दही टाका आणि चवीप्रमाणे मीठ, साखर घालून एकजीव करा.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
अशी ही रुग्णसेवा, छ. संभाजीनगरमध्ये गरजूंना होतीये मोठी मोफत मदत, अनोखा उपक्रम काय?
सर्व पहा

छोट्या कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी टाकून फुटू द्या. मग सुकी लाल मिरची, जिरे आणि कढीपत्ता घालून एक छान फोडणी वास येईल तोवर तडतडा. ही फोडणी तंबळीवर ओतून हलकेच मिसळा. आपली तंबळी तयार झाली.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
उन्हाळ्यात शरीराला आरोग्यदायी, घरीच बनवा चमचमीत काकडीची तंबळी, रेसिपीचा संपूर्ण Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल