सरबतासाठी लागणारे साहित्य
उकडलेल्या कैरीचा गर, पिकलेल्या आंब्याच्या फोडी, थोडी साखर, भिजवलेल्या सब्जा बी, वाळलेली पुदिन्याची पाने, चाट मसाला, काळे मीठ, मिरचीचे काप आणि आले हे एवढे साहित्य लागेल.
गव्हाचा पिठापासून बनवा विदर्भ स्टाईल पापडा, वर्षभर राहील टिकून, एकदम सोपी रेसिपी
सरबत करण्यासाठी कृती
advertisement
सरबत तयार करण्यासाठी सर्वप्रथम एका मिक्सरच्या भांड्यामध्ये उकडलेल्या कैरीचा गर घालायचा. त्यानंतर पिकलेल्या आंब्याच्या फोडी घालायच्या. त्यामध्ये चवीनुसार साखर टाकायची. चाट मसाला, आले आणि मिरचीचे काप टाकायचे. त्यानंतर त्यामध्ये वाळलेली पुदिन्याची पाने टाकायची किंवा तुम्ही ताजा पुदिना देखील यामध्ये टाकू शकता. सगळ्यात शेवटी चवीनुसार काळे मीठ त्यामध्ये ऍड करायचं. हे सर्व साहित्य मिक्सरमधून चांगल्या पद्धतीने बारीक करून घ्यायचे.
हे सर्व साहित्य एकदा बारीक करून घेतल्यानंतर त्यामध्ये पाणी घालायचे. पाणी हे तुम्हाला हवे तेवढे पाणी त्यात तुम्ही टाकू शकता. आणि पाणी टाकल्यानंतर परत एकदा त्याला चांगले बारीक करून घ्यायचे. अशा पद्धतीने हे सरबत तयार होते. हे सर्व करण्यासाठी थोडेसे बर्फाचे तुकडे त्यामध्ये टाकायचे. तर या उन्हाळ्यामध्ये हे झटपट तयार होणारे सरबत नक्की एकदा ट्राय करा.