लिंबू क्रश लोणचे बनवण्यासाठी लागणारे साहित्य
1 किलो लिंबू, अर्धा किलो साखर, मीठ, लाल तिखट आणि जिरे पूड, हे सर्व साहित्य तुम्हाला पाहिजे त्या चवीनुसार घ्यायचं आहे.
कोकणातील प्रसिद्ध कोंबडी वडे कसे बनवतात, ही आहे अगदीच सोपी पद्धत, रेसिपीचा VIDEO
लिंबू क्रश लोणचे बनविण्याची कृती
सर्वात आधी लिंबाचे काप करून घ्यायचे आहेत. त्यानंतर त्यातील सर्व बिया काढून घ्यायच्या आहेत. बिया राहिल्यास लोणचे कडू होण्याची शक्यता असते. नंतर काप केलेले लिंबू आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आहे. लिंबाची खूप बारीक पेस्ट करायची नाही. थोडे बारीक काप त्यात राहायला पाहिजेत. नंतर लोणचे बनविण्यासाठी स्टीलचे भांडे घ्यायचे आहे. लोणचे बनविण्यासाठी लोखंड किंवा जर्मन वापरू शकत नाही. त्यात लोणचे अधिक आंबट होते. त्यामुळे स्टीलचे भांडे घ्यायचे आहे.
advertisement
भांडे गॅसवर ठेवल्यानंतर त्यात लिंबाची पेस्ट टाकून घ्यायची आहे. लगेच त्यात जिरे पूड, लाल तिखट आणि मीठ टाकून घ्यायचे आहे. त्यानंतर ते मिक्स करून घ्यायचे आहे. मिक्स करून झालं की, साखर टाकून घ्यायची आहे. साखरेऐवजी गूळ सुद्धा वापरू शकता. साखरेचे प्रमाण कमी जास्त करू शकता. साखर त्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. नंतर साखरेला व्यवस्थित पाक येऊ द्यायचा आहे. मध्यम आचेवर हे लोणचे तयार करायचे आहे. कमीतकमी 20 मिनिटे पाक येण्यासाठी लागतात.
नंतर पाक जाडसर झाला आणि छान कलर आला की लोणचे तयार झालेले असेल. नंतर 1 तास हे थंड होऊ द्यायचे आहे. त्यासाठी यावर कापड झाकून ठेवू शकता. 1 तासानंतर लोणचे छान तयार झाले असेल. आता हे तुम्ही काचेच्या भांड्यात साठवून ठेवू शकता. आरामात हे लोणचे वर्षभर टिकते. चवीला अतिशय टेस्टी असे चटपटीत लोणचे तयार होते. तुम्ही नक्की बनवून बघा.





