मँगो मस्तानीसाठी लागणारे साहित्य
एक मोठा हापूस आंबा (तुम्ही या ठिकाणी कोणताही आंबा वापरू शकता) एक ग्लास भरून दूध, साखर, व्हॅनिला आईस्क्रीम (किंवा तुम्ही तुमच्या चॉईसनुसार कुठलीही आईस्क्रीमचा फ्लेवर घेऊ शकता.) आंब्याच्या फोडी आणि आवडीनुसार ड्रायफ्रूट्स हे साहित्य लागेल.
Tofu Or Paneer : टोफू की पनीर कशामध्ये आहे जास्त प्रोटीन? काय खाणे बेस्ट?
advertisement
मँगो मस्तानी कृती
सर्वप्रथम आपण जो आंबा घेतलेला आहे त्याच्या बारीक बारीक फोडी करून त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायच्या आहेत. त्यामध्ये दूध टाकायचं आहे. यांची घट्टसर अशी प्युरी करून घ्यायची आहे. तुमच्या चवीनुसार यामध्ये तुम्ही साखर देखील टाकू शकता. यांचं सगळं एकत्र मिश्रण करून घ्यायचं. ही तयार झालेली प्युरी आता सर्व्ह करायची आहे. सर्व्ह करण्यासाठी एका ग्लासमध्ये सर्वप्रथम व्हॅनिला आईस्क्रीम टाकायची त्यानंतर त्यावरती मँगोची प्युरी टाकायची. वरतून परत व्हॅनिला आईस्क्रीम टाकायची. वरतून परत मॅंगोची प्युरी टाकायची. त्यावरून आपण जे आंब्याचे काप करून ठेवलेले आहेत ते त्यावरतून टाकायचे. जर तुम्हाला आवडत असेल तर त्यावरती तुम्ही तुमच्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स देखील टाकू शकता. अगदी सोप्या पद्धतीची मँगो मस्तानी बनवून तयार होते.