मसाला चहा बनवण्यासाठी लागणारे साहित्य
साखर, चहा पावडर, दूध, वेलची, कलमी, स्टार फुल, मिरे, सुंठ, लवंग, जायफळ हे साहित्य लागेल.
Famous Misal Pune: 27 वर्षांचा वारसा, पुण्यात झणझणीत मिसळ खावी तर इथंच, असते मोठी गर्दी
मसाला चहा बनवण्याची कृती
advertisement
सर्वात आधी मसाला तयार करून घ्यायचा आहे. त्यासाठी वेलची, लवंग, कलमी, स्टार फुल, मिरे, सुंठ, जायफळ हे सर्व साहित्य बारीक करून घ्यायचं आहे. बारीक करण्यासाठी मिक्सर किंवा मग खलबत्ता सुद्धा तुम्ही वापरू शकता. हे सर्व जिन्नस एकत्र बारीक करून घेतले की, चहाचा मसाला तयार होतो. मसाला तयार करण्यासाठी सर्व साहित्य हे सारख्या प्रमाणात घ्यायचे आहे. तुम्हाला यातील मिरे, लवंग यापैकी काही स्किप करायचे असल्यास तुम्ही करू शकता.
मसाला तयार झाल्यानंतर चहा बनवून घ्यायचा आहे. त्यासाठी जेवढं दूध तेवढं पाणी घ्यायचं आहे. 1 कप दूध असेल तर 1 कप पाणी घेऊन त्यात तुम्हाला पाहिजे त्या अंदाजानुसार त्यात साखर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर चहा पावडर टाकून घ्यायची आहे. त्यानंतर लगेच मसाला टाकून घ्यायचा आहे. मसाला सुद्धा तुम्ही चवीनुसार टाकू शकता.
त्यानंतर चहा शिजवून घ्यायचा आहे. चहा शिजवण्यासाठी गॅसची फ्लेम ही कमी ठेवायची आहे. त्यानंतर चहाला 3 ते 4 उकळी काढून घ्यायच्या आहेत. त्यानंतर चहा तयार होईल. घरगुती साहित्यापासून तुम्ही चविष्ट आणि कडक असा चहा बनवू शकता.