मेथी पराठा साहित्य
गव्हाचं पीठ – 2 कप
ताजी मेथी (चिरलेली) – 1 कप
हिरवी मिरची – 1 (बारीक चिरलेली)
आलं-लसूण पेस्ट – 1 टीस्पून
हळद – ¼ टीस्पून
जिरे – ½ टीस्पून
लाल तिखट – चवीनुसार
मीठ – चवीनुसार
तेल – 1–2 टेबलस्पून
पाणी – कणीक मळण्यासाठी
तूप/तेल – पराठे भाजण्यासाठी
advertisement
मेथी पराठा कृती
एका मोठ्या भांड्यात गव्हाचं पीठ, चिरलेली मेथी, हिरवी मिरची, आलं-लसूण पेस्ट आणि सगळे मसाले घाला. थोडं तेल टाकून पाणी घालत मऊ कणीक मळा. कणीक 10 मिनिटं झाकून ठेवा. नंतर लहान गोळे करून पराठे लाटा. गरम तव्यावर दोन्ही बाजूंनी तूप/तेल लावून सोनेरी होईपर्यंत भाजा.
वाढण्याची पद्धत
दही, लोणचं, बटर किंवा हिरवी चटणीसोबत गरमागरम मेथी पराठे सर्व्ह करा.
टिप्स:
मेथी कडू वाटत असेल तर चिरल्यानंतर थोडी मीठ चोळून पिळून घ्या.
डब्यासाठी बनवत असाल तर थोडं जास्त तेल घातलं तरी चालतं – पराठे मऊ राहतात.
हा पौष्टिक आणि चविष्ट मेथी पराठा नाश्त्यासोबतच लंच किंवा डिनरसाठीही परफेक्ट आहे.





