TRENDING:

आरोग्यासाठी एकदम योग्य, हिवाळ्यात करा बाजरी मेथी पराठा, संपूर्ण रेसिपी VIDEO

Last Updated:

थंडीच्या दिवसांमध्ये ज्वारी, बाजरीचे सेवन जास्तीत जास्त करावे असा सल्ला डॉक्टर देतात. तर हा पराठा तुमच्या आरोग्यासाठी एकदम योग्य असा पर्याय आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
निकता तिवारी, प्रतिनिधी 
advertisement

मुंबई : दैनंदिन आहारात गव्हाची चपाती किंवा ज्वारी, बाजरीची भाकरी ही नेहमीच असते. मात्र या रेग्युलर रुटीनला जर तुम्ही कंटाळले असाल आणि काहीतरी हटके टेस्टी खाण्याची तुमची इच्छा असेल तर बाजरीचा मेथी पराठा ही रेसिपी नक्की ट्राय करा. थंडीच्या दिवसांमध्ये ज्वारी, बाजरीचे सेवन जास्तीत जास्त करावे असा सल्ला डॉक्टर देतात. तर हा पराठा तुमच्या आरोग्यासाठी एकदम योग्य असा पर्याय आहे. बाजरी मेथी पराठा ही अगदी कमी वेळेत होणारी ही रेसिपी चविष्ट आणि पौष्टिक आहे. घरच्या घरी बाजरी मेथी पराठा कसा बनवायचा? याबद्दलचं आपल्याला मुंबईतील गृहिणी रफीका सोलकर यांनी माहिती सांगितली आहे.

advertisement

बाजरीचा मेथी पराठा बनवण्यासाठी साहित्य 

बाजरीचे पीठ, मेथी, काळीमिरी, मीठ, लसूण आणि मिरच्या हे साहित्य आवश्यक आहे.

बाजरी मेथी पराठा कसा बनवाल?

सुरुवातीला गरम पाण्यामध्ये पीठ मळायला सुरुवात करायची. बाजरी पीठ आणि मेथी मिश्रण एकत्र करताना गरम पाणी आवश्यक असते. त्यामुळे गरम पाणी करुन घ्यायचे. मात्र गरम पाण्यात सुरुवातीला पीठ मळताना शक्यतो चमचा वापरावा आणि पाणी थोडे कोमट झाल्यावर हाताने योग्य पीठ मळावे. त्यानंतर स्वच्छ धुऊन घेतलेली मेथी बारीक चिरून बाजरीच्या पिठात मिक्स करायची. पीठ मळताना त्याच्यात थोड्याशा मिरच्या, बारीक चिरलेला लसूण, मीठ आणि काळीमिरी पावडर हे मिश्रण देखील एकजीव करायचे आहे.

advertisement

बाजरी पीठ आणि मेथी हे मिश्रण एकत्र करून एक चविष्ट पराठा तयार होतो. पीठ मळताना एक गोष्ट लक्षात घ्यावी ती म्हणजे मेथी ही व्यवस्थित बारीक चिरलेली असली पाहिजे जर त्याची पाने राहिली तर पराठा झाल्यानंतर ती पाने खाताना तोंडात येण्याची शक्यता असते. आता आपले मळलेले पीठ तयार झाले असून चपाती प्रमाणे या मिश्रणाच्या पिठाचे देखील गोळे करायचे आहेत. गोळे करुन झाल्यावर एक एक करुन पण हळूहळू पराठे लाटून घ्यायचे आहेत. तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही पराठा हाताने देखील थापू शकता.

advertisement

आपण चपाती प्रमाणे लाटलेला हा पराठा तव्यावर टाकावा आणि भाकरी प्रमाणे त्यावर वरुन पाणी टाकून भाजून घावे. घरच्या घरी तुमचा चविष्ट बाजरी मेथी पराठा तयार होईल. पराठा भाजल्यानंतर त्यावर तुप लावावे. पराठाला एक वेगळी चव तयार होते.

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
आरोग्यासाठी एकदम योग्य, हिवाळ्यात करा बाजरी मेथी पराठा, संपूर्ण रेसिपी VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल