वर्धा : शेवग्याच्या शेंगा आपल्या शरीरासाठी अतिशय फायदेशीर आहेत. अनेक जण शेवग्याच्या शेंगांची भाजी आवडीने खातात. तसेच शेवग्याच्या शेंगांची कढी सुद्धा अतिशय चविष्ट लागते. आरोग्यासाठी हितकारक असलेल्या शेवग्याच्या शेंगांची कढी नेमकी कशी बनवतात? यासंदर्भात वर्धा येथील गृहिणी समीक्षा चव्हाण यांनी माहिती दिली आहे.
शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी साहित्य
साल काढून घेतलेल्या कोवळ्या शेवग्याच्या शेंगा, तूप, 2 कप ताक, 2 टीस्पून बेसन, 1 टीस्पून कैरीचा किस, चावीनुसार मीठ, मिरची, कढिपत्ता, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेल्या 2 लसूण कळ्या, जिरं मिहोरी, हळद हिंग हे साहित्य लागेल.
advertisement
उन्हाळ्यात दही ताकाची नाहीतर कैरीची बनवा आंबट गोड कढी, बनवण्याची पद्धत पाहा
शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी कृती
सर्वप्रथम शेंगा गरम पाण्यात उकळून घ्यायच्या आहेत. उकळताना त्यात एक चमचा कैरीचा किस आणि थोडसं मीठ अॅड करायचं आहे. दुसरीकडे कढीला सुरुवात करायची. कच्च्या ताकात आलं पेस्ट, जिरेपूड, हळद 2 टीस्पून बेसन अॅड करा. रवीच्या साह्याने घुसळून घ्या. कढईत साजूक तूप घालून त्यात जिरे, मोहरी, बारीक चिरलेली मिरची, कढीपत्ता, लसूण आणि हिंग, थोडं मीठ, अॅड करून छान एकत्र करून घ्या आणि आता हे ताक त्यात अॅड करा. थोडं पाणी घालून उकळी येऊ द्या. दरम्यान त्यात उकळलेल्या शेवग्याच्या शेंगा अॅड करून घ्या. आणि मस्त उकळी येऊ द्या. कोथिंबीर घालून गरमागरम कढी सर्व्ह करा. अशाप्रकारे अगदी सोप्पा पद्धतीने शेवग्याची कढी तयार होते, असं समीक्षा चव्हाण सांगतात.