TRENDING:

सायंकाळच्या नाश्त्याच टेन्शन सोडा, कमी वेळात बनवा चटपटीत मुरमुरे चिवडा, पाहा रेसिपी Video

Last Updated:

सायंकाळच्या वेळी हलका नाश्ता पाहिजे असतो. अशावेळी मग अनेक वेळा मॅगी, पोह्यांचा चिवडा यासारखे पदार्थ बनवले जातात. यावर एक ऑप्शन म्हणून तुम्ही मुरमुरे चिवडा बनवू शकता. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
प्रगती बहुरुपी, प्रतिनिधी
advertisement

अमरावती : सायंकाळच्या वेळी दररोज नाश्त्यासाठी काय बनवायचं? हा सर्वात मोठा प्रश्न गृहिणींना पडतो. कारण सायंकाळच्या वेळी हलका नाश्ता पाहिजे असतो. अशावेळी मग अनेक वेळा मॅगी, पोह्यांचा चिवडा यासारखे पदार्थ बनवले जातात. यावर एक ऑप्शन म्हणून तुम्ही मुरमुरे चिवडा बनवू शकता. अगदी कमीत कमी वेळात चटपटीत असा मुरमुरे चिवडा कसा बनवायचा? याची रेसिपी अमरावतीमधील जया भोंडे यांनी सांगितली आहे. 

advertisement

मुरमुरे चिवडा बनवण्यासाठी लागणारे साहित्य

मुरमुरे, शेंगदाणे, दाळवा, कोथिंबीर, हिरवी मिरची, खोबरे, तेल, पिठी साखर, जिरे, मोहरी, लाल तिखट, हळद, काळे मीठ, आमचूर पावडर, साधे मीठ आणि कडीपत्ता हे साहित्य लागेल. 

जेवणाची थाळी तिही 8 वेगवेगळ्या प्रकारात, ठाण्यात कधी इथं आला का?

मुरमुरे चिवडा बनवण्याची कृती 

advertisement

सर्वात आधी कढईमध्ये तेल टाकून ते गरम होऊ द्यायचं आहे. तेल थोड गरम झालं की त्यात मोहरी टाकायची. मोहरी नंतर जिरे टाकायचे. जिरे तळतळले की त्यात दाळवा टाकून घ्यायचा. ते व्यवस्थित परतवून घ्यायचं. त्यानंतर त्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची आणि ते व्यवस्थित लालसर होऊ द्यायचं. थोड लालसर झाल्यानंतर त्यात कडीपत्ता टाकून घ्यायचा. कडीपत्ता परतवून घ्यायचा. त्यांनतर खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे. ते 5 मिन शिजवून घ्यायचं आणि त्यात कोथिंबीर टाकून घ्यायचा. त्यानंतर ते मिश्रण 2 मिनिट आणखी शिजवून घ्यायचं. शिजवून घेतल्यानंतर त्यात आपण हळद टाकून घेऊ. हळद या मिश्रणात व्यवस्थित परतवून घ्यायची आहे. त्यानंतर लाल तिखट टाकून घ्यायचं आणि 2 मिनिट आणखी शिजवून घ्यायचं आहे. 

advertisement

त्यानंतर चिवडा मसाला तयार होईल. त्यांनतर त्यात मुरमुरे टाकून घ्यायचे. मुरमुरे त्या मसाल्यात व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. त्यानंतर त्यात काळे मीठ, आमचूर पावडर, साधे मीठ आणि बारीक केलेली साखर टाकून घ्या. चिवडा चटपटीत बनवण्यासाठी लागणारे सर्व साहित्य टाकून घेतले की ते व्यवस्थित मिक्स करून घ्या. चिवडा मिक्स करून झाला की, मुरमुरे छान कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे. कमीत कमी वेळात चटपटीत असा मुरमुरे चिवडा तयार होईल.

advertisement

मराठी बातम्या/लाइफस्टाईल/रेसिपी/
सायंकाळच्या नाश्त्याच टेन्शन सोडा, कमी वेळात बनवा चटपटीत मुरमुरे चिवडा, पाहा रेसिपी Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल