गाजराचे घारगे बनवण्यासाठी लागणारं साहित्य
गाजराचा किस, गूळ, तूप, हरभरा डाळीचे पीठ, रवा, गव्हाचे पीठ, वेलची पावडर, खसखस, तेल, मीठ चवीनुसार हे साहित्य लागेल.
Success Story : आयटीतील नोकरी सोडली, आता आनंद विकतायत पोहे, महिन्याला 3 लाखांची उलाढाल
गाजराचे घारगे बनवण्यासाठी कृती
सुरुवातीला गाजर स्वच्छ धुवून साली काढून बारीक किसावे. नंतर मध्यम आचेवर तूप घालून 5–6 मिनिटे परतावे. त्यात गूळ घालून 15–20 मिनिटे मंद आचेवर शिजवावे आणि थंड होऊ द्यावे. थंड झाल्यावर वेलची पावडर, मीठ, बेसन, बारीक रवा, गव्हाचे पीठ आणि 2 टेबलस्पून तेल घालून पिठाचा गोळा तयार करावा. गोळा 15–20 मिनिटे मुरवून लहान गोळे करून जाडसर पारी लाटावी, त्यावर खसखस पसरवून डब्याच्या झाकणाने समान आकारात कापावे. नंतर मध्यम आचेवर तळून थंड झाल्यावर डब्यात भरावे. अश्या रीतीने आपले गाजराचे घारगे खाण्यासाठी तयार आहेत.
advertisement





