ओट्स उपमासाठी साहित्य:
ओट्स – 1 कप
तेल – 1 टेबलस्पून
मोहरी – ½ टीस्पून
कढीपत्ता – 8–10 पाने
हिरवी मिरची – 1 (चिरलेली)
कांदा – 1 मध्यम (सातऱ्याने चिरलेला)
टोमॅटो- अर्धा चिरलेला
गाजर, फरसबी, मटार – हवी तेवढी (चिरून)
मीठ – चवीनुसार
advertisement
कोथिंबीर – सजावटीसाठी
लिंबू रस – ½ टीस्पून (ऐच्छिक)
ओट्स बनवण्याची कृती
ओट्स भिजवून ठेवणे. कढईत तेल गरम करा. त्यात मोहरी, कढीपत्ता आणि हिरवी मिरची, चिरलेला कांदा घालून लालसर परता आणि मग त्यात टोमॅटो टाका. पुन्हा ते व्यवस्थित परतून घ्या. त्यात चवीनुसार मीठ घाला. मंद आचेवर 2-3 मिनिटे ठेवा. उपमा तयार झाला की शेवटी कोथिंबीर आणि लिंबू रस घालून सर्व्ह करा.
Famous Misal Pune: तुपातली मिसळ कधी खाल्लीये का? पुण्यात एकाच ठिकाणी मिळतायत 6 प्रकार, चव एक नंबर!
फायदे
फायबरने भरपूर आहे. वजन कमी करण्यासाठी उपयुक्त तसेच झटपट आणि पोटभर आहे. डायबेटिक आणि फिटनेस प्रेमींसाठी योग्य. तर अशा प्रकारे कंटाळवाण्या ओट्सला द्या हटके वळण आणि आरोग्यदायी दिवसाची सुरुवात करा चविष्ट ओट्स उपमासोबत.