अमरावती :- अनेक वेळा आपल्या जिभेची चव बदलते आणि मग काही तरी चटपटीत खाण्याची इच्छा होते. नेहमी नेहमी एकच एक पदार्थ, बाहेरील पदार्थ खाऊन बोर होते. मग गोड, आंबट, तिखट हे पदार्थ वेगवेगळे खाऊन झालेत. पण आता ही सर्व चव एकत्र घ्यायची आहे. तर मग सर्वात आधी डोक्यात विचार येतो तो म्हणजे पंचामृत. पंचामृत हा पदार्थ नेहमी बनवला जात नाही. पण नवरात्री, गणेश उत्सव अशा वेळी आवर्जून बनवला जातो. मग आंबट, गोड, तिखट अशी चव असणारा हा पदार्थ कसा बनवायचा? याची रेसिपी आपल्याला अमरावतीमधील गृहिणी निर्मला पापळकर यांनी सांगितली आहे.
advertisement
पंचामृत बनवण्यासाठी लागणारे साहित्य
तेल, जिरे, कडीपत्ता, बारीक चिरलेली मिरची, हळद, मीठ, साखर, शेंगदाणे कूट, आमसूल हे साहित्य लागेल.
मुबंईतील नोकरी परवडेना, आज गावी दिवसाला कमावतोय 7 ते 8 हजार रुपये नफा, तरुणानं करुन दाखवलं!, VIDEO
पंचामृत बनवण्यासाठीची कृती
सर्वात आधी कढई गॅसवर ठेवून घ्यायची. त्यात तेल घालून ते तेल गरम होऊ द्यायचे. गरम झाल्यानंतर त्यात जिरे, कडीपत्ता, मिरची घालून घ्यायची. थोडा वेळ ते परतवून घ्यायचं. मिरची शिजायला आली की त्यात हळद आणि मीठ घालायचं. ते सुद्धा परतून घ्यायचं. नंतर त्यात आमसूल घालायचं. त्यात थोडे पाणी घालून ते नरम होऊ द्यायचं.
आता त्यात शेंगदाणा कुट आणि साखर घालायची. नंतर त्यात थोडे पाणी घालून साखरेला व्यवस्थित पाक येतपर्यंत ते शिजुवून घ्यायचं. तुम्ही साखरे ऐवजी गूळ सुद्धा वापरू शकता. 10 मिनिटांनी आता पंचामृत शिजलेले आहे. गोड, आंबट, तिखट अशी चव असणारे पंचामृत खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही चपातीसोबत सुद्धा हे पंचामृत खाऊ शकता.