पेरूच्या चटणीसाठी लागणारे साहित्य
2 मध्यम आकाराचे पेरू, थोडीशी कोथिंबीर, आठ-दहा लसणाच्या पाकळ्या, 2 हिरव्या मिरच्या, जिरेपूड, साखर, मीठ, मोहरी आणि जिरे एवढे साहित्य यासाठी लागणार आहे.
वरण बट्टी आणि वांग्याची भाजी... पाहा, ही अस्सल चव नेमकी कशी तयार होते...
पेरूची चटणी करायची रेसिपी
सगळ्यात पहिले तर पेरू स्वच्छ धुऊन घ्यायचे. त्यानंतर त्याला मधून कट मारायचा आणि त्यामध्ये लसणाच्या पाकळ्या टाकायच्या आणि त्याला तेल लावून गॅसवरती सर्व बाजूने छान भाजून घ्यायचे. त्यासोबत दोन ज्या मिरच्या आहेत त्या देखील व्यवस्थितरित्या भाजून घ्यायच्या. भाजून झाल्यानंतर पेरूवरचे जे काळं हलकट आहे ते काढून घ्यायचं आणि त्याचे काप करून मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकायचे.
advertisement
त्यासोबत लसणाच्या पाकळ्या देखील आणि हिरवी मिरची देखील टाकायची. थोडीशी जिरेपूड टाकायची, साखर देखील टाकायची. साखर याकरता की जर पेरू आंबट असेल, तर चटणी जास्त आंबट होणार नाही. कोथिंबीर देखील टाकायची आणि हे सर्व एकत्र एकजीव करून घ्यायचं, बारीक करून घ्यायचे एकदम.
हे सर्व बारीक झाल्यानंतर कढईमध्ये तेल घ्यायचं. त्यामध्ये जिरे, मोहरी आणि हिंग टाकायचा, कढीपत्ता देखील टाकायचा आणि ती तयार केलेली फोडणी चटणीवरती टाकायची. अशा पद्धतीने ही जी चटणी आहे ही बनवून तयार होते. अगदी झटपट ही चटणी बनवून तयार होते. तुम्ही देखील चटणी घरी एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला देखील खूप आवडेल.





