शेवग्याच्या फुलांची भाजी बनवण्यासाठी लागणारे साहित्य
शेवग्याची फुलं, बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर, ओलं खोबरं, जिरे, हळद, मीठ आणि तेल हे साहित्य लागेल.
शेवग्याच्या फुलांची भाजी बनवण्याची कृती
शेवग्याची ताजी फुलं तोडल्यानंतर ती स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर ती धुवून घ्यायची आणि कापून घ्यायची आहेत. नंतर गॅसवर कढईत तेल टाकून ते गरम होऊ द्यायचं आहे. तेल गरम झालं की त्यात जिरे टाकून घ्या. जिरे तडतडले की लगेच मिरची टाकून घ्या. मिरची थोडी परतली की, त्यात कांदा टाकून घ्या.
advertisement
कांदा लालसर होईपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. त्यानंतर त्यात मीठ आणि हळद टाकून घ्या. नंतर शेवग्याची फुलं टाकून घ्यायची आहेत. ही फुलं 5 ते 10 मिनिटे शिजवून घ्यायची आहेत. भाजी तयार झालेली असेल. यावर कोथिंबीर आणि ओलं खोबरं टाकून ही भाजी तुम्ही भाकरी किंवा पोळी सोबत खाऊ शकता. आरोग्यासाठी अतिशय फायदेशीर असलेली ही भाजी कमीत कमी वेळात तयार होते.





